Marathi News> भविष्य
Advertisement

होळीच्या दिवशी शनिदेवाचा आशिर्वादासाठी 8, 17, 26 या जन्मतारखेच्या लोकांनी करावं 'हे' काम!

Holi NumerologyTips in Marathi : 8, 17, 26 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा शनि ग्रह कारक असतो. त्यामुळे होळीच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अंकशास्त्रतज्ज्ञ यांनी उपाय सांगितले आहेत. 

होळीच्या दिवशी शनिदेवाचा आशिर्वादासाठी  8, 17, 26 या जन्मतारखेच्या लोकांनी करावं 'हे' काम!

Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळी रे होळी पुरणाची पोळी...होळीचा उत्साह हा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांमध्ये दिसून येतो. होळी हा रंगांचा उत्साह. अंकशास्त्रानुसार अंक, रंग आणि ग्रह यांचा खूप जवळचा संबंध आहे. होळीचा सण 8, 17, 26 या जन्मतारखेच्या लोकांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि प्रगती आणण्यासाठी या दिवशी काय करावं याबद्दल सांगण्यात आलंय. होळीला उठल्यावर काय करावं, कुठल्या रंगाचे कपडे परिधान करावे. कुठल्या रंगानी होळी खेळावी त्यासोबत कुठल्या उपाय केल्यास ही होळी तुमच्या आयुष्यात आनंद आणेल याबद्दल . अंकशास्त्रतज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (numerology prediction do these upay on holi with people born on date 8 17 26 ank shashtra)

होळीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी 8 मूलांक लोकांनी काय करावं?

अंकशास्त्रानुसार 8, 17, 26 या तारखेला ज्यांचा जन्म झालेला असतो त्या लोकांनाचा मूलांक हा 8 असतो. 8 क्रमांकाचा कारक हा कर्मदाता आणि न्यायदेवता शनिदेव असतो. हा वर्षदेखील शनिचं वर्ष आहे. अंकशास्त्रानुसार 8, 17, 26 या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी यंदाची होळी अतिशय महत्त्वाची आहे. शनिचा रंग हा काळा किंवा गडद निळा आहे. निळा रंग हा शांती आणि आनंदाचा कारक आहे. तर काळा हा अंधाराचा रंग आहे. काळा रंग हा आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण देतं.

हेसुद्धा वाचा - अंकशास्त्रानुसार 7, 16, 25 या जन्मतारखेच्या लोकांनी Luck मजबूत करण्यासाठी 'या' रंगांनी होळी खेळावी!

त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्ही पांढरे, निळा किंवा ग्रे रंगाचे कपडे घालावे. त्याशिवाय तुम्ही हिरवा, निळा, ब्राऊन या रंगाने होळी खेळू शकता. काळा रंगानेही थोड तुम्ही खेळू शकता. होळीच्या दिवशी लवकर उठा आणि पिंपळाच्या झाडाजवळ शुद्ध तूपाचा दिवा लावा.

त्याशिवाय होळीच्या दिवशी जेवण्यापूर्वी घरातील काम करणाऱ्या लोकांना तळलेले पदार्थ म्हणजे पुरी, कचोरी, नमकीन नक्की खायला द्या. त्यासोबतच त्यांना थोडफार प्रमाणात बोनस नक्की द्या. 
तसंच होळीच्या दिवशी लहान मुलांना स्टेशनरी सामानासोबत रंग नक्की गिफ्ट करा. या उपायामुळे तुम्ही आयुष्यात आनंद आणि प्रगतीचा मार्ग मोकळा कराल. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More