Marathi News> भविष्य
Advertisement

Name Astrology: 'या' अक्षराच्या मुलींना मिळतो देवी लक्ष्मीचा खास आर्शीवाद; होतो भाग्योदय

Name Astrology: तुमच्या नावाची सुरूवात जर 'या' खालील दिलेल्या अक्षरांनी होत असेल तर तुमचा भाग्योदय हा उजळेल. 

Name Astrology: 'या' अक्षराच्या मुलींना मिळतो देवी लक्ष्मीचा खास आर्शीवाद; होतो भाग्योदय

Name Astrology: आपल्या नावावरून अनेक गमतीजमतीही असतात त्यातून ज्योतिषशास्त्रातही (Astro Tips) नावावरून अनेकांचे व्यक्तिमत्त्व ओळखता येऊ शकते आणि जर का त्यांचे नावं हे कुठल्या देव देवतांच्या आधारावरून असतील तर त्या नावांना विशेष महत्त्व प्राप्त होते. जर का तुमचे नावं हे लक्ष्मीच्या नावांपासून सुरू होत असेल तर त्या नावाच्या मुलींना वेगळा भाग्योदय (Devi Laxmi) मिळतो. त्यांचे भविष्य खुलते आणि त्यांना देवी लक्ष्मीचा आशिर्वादही मिळतो. तेव्हा जाणून घेऊया की कोणत्या नावाच्या मुली लकी ठरताता त्याच्या (Prosperity) नाव काही विशिष्ट अक्षरानं सुरू होते. तुमच्या नावाची सुरूवात जर या खालील दिलेल्या अक्षरांनी होत असेल तर तुमचा भाग्योदय हा उजळेल. 

'L' अक्षर नाव असलेल्या मुली

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींचे नाव 'L 'ने सुरू होते त्या मनाने निर्मळ, स्वच्छ आणि बुद्धिमान असतात. या अक्षराच्या मुली ह्या सासरच्यांसाठी भाग्यवान मानले जातात आणि त्या स्वभावानेही कायम आनंदी असतात. त्या त्यांच्या स्वभावाने इतरांना खूप आकर्षित करतात त्यामुळे अशा मुली सासरीही चांगल्या रमतात. या मुली त्यांच्या कुटुंबासाठी लक्ष्मीचे (Laxmi Krupa) रूप असतात. घरात पाऊल ठेवताच त्यांच्या येण्याने घरात संपत्ती आणि भरभराट येते. 

'A' अक्षर नाव असलेल्या मुली

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींच्या नावाची सुरुवात A अक्षराने होते त्यांच्या जीवनात धन-धान्याची कमतरता नसते त्यामुळे त्यांची सासरी आणि माहेरी चांगली प्रगती होते. त्यांच्यामुळे इतरांचीही होते. या अक्षराच्या नावाच्या मुलींवर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. यासोबतच त्यांच्याशी संबंधित लोकांनाही नशिबाची साथ मिळते. नवऱ्यालाही तिच्या भाग्याची साथ मिळते आणि त्यांची भरभराट होते. 

'D' अक्षर नाव असलेल्या मुली

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींचे नाव D अक्षराने सुरू होते त्यांच्यावर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असते. या मुली मनाने शुद्ध,पवित्र असतात. D अक्षर असलेल्या मुलींचा स्वभाव अगदी साधा असतो. त्यांच्या मनात जे काही घडते ते त्या लगेच सांगतात. त्यांचे मनं हे आपुलकीनं भरलेले असते. त्या प्रचंड मेहनती असल्यानं त्यांना कायमच कामात यश मिळते ज्याचा फायदा त्यांच्यासोबत असणाऱ्या माणसांनाही होतो. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर त्या त्यांच्या स्वभावाने सासरच्या सर्व सदस्यांची मनं लवकरच जिंकण्यात यशस्वी होतात. या मुली आपल्या सासर आणि नवऱ्यासाठी भाग्यवान ठरतात. त्यामुळे या अक्षरांच्या मुलींशी जे कोणी लग्न करतं त्यांचे भाग्य उजळते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More