Marathi News> भविष्य
Advertisement

Monthly Shivratri: या दिवशी असेल मार्गशीर्ष महिन्याची शिवरात्री, अशी करा पूजा-व्रत; प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Margashirsha Shivratri News: भगवान शिवशंकर उपासनेचा सण शिवरात्री जरी दर महिन्याला येत असली तरी मार्गशीर्ष महिन्यात शिवरात्रीचे महत्त्व काहीसे खास आहे. या दिवशी उपासना आणि व्रत केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

Monthly Shivratri: या दिवशी असेल मार्गशीर्ष महिन्याची शिवरात्री, अशी करा पूजा-व्रत; प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Masik Shivratri 2022: हिंदू धर्मात शिवरात्रीचे खूप महत्त्व आहे. दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी खऱ्या मनाने पूजा-व्रत आणि उपवास केल्यास माणसाचे प्रत्येक कठीण काम सोपे होते, अशी श्रद्धा आहे. हा महिना मार्गशीर्ष आहे. हिंदू धर्मात या महिन्याचे खास महत्त्व आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला पूजा आणि व्रत केल्यास विशेष फळ देते. यावेळी 22 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी मासिक शिवरात्री साजरी केली जाणार आहे.

इच्छापूर्ती करणारी शिवरात्री

मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही शिवरात्री अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. जो भक्त या शिवरात्रीला खऱ्या मनाने उपवास करतो आणि भगवान भोलेनाथांची पूजा करतो. भगवान शंकराची कृपा त्याच्यावर राहते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो.

तिथीनुसार शिवरात्री

मार्गशीर्ष महिन्यात येणारी शिवरात्री 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.49 वाजता सुरु होईल आणि 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.53 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार यावेळी शिवरात्री 22 नोव्हेंबरलाच साजरी होणार आहे.

पूजा-व्रत पद्धत

मासिक शिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. यानंतर शिवमंदिरात जाऊन पूजा करावी. शिवलिंगाचा रुद्राभिषेक जल, शुद्ध तूप, दूध, साखर, मध, दही यांनी करावा. त्यानंतर बेलपत्र,  धतूरा आणि श्रीफळ, फुले अर्पण करा. आता धूप, दीप, फळे आणि फुलांनी भगवान शंकराची मनोभावे पूजा करा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळते. तसेच मनातील ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होण्यास मदत होते.

 शिव श्लोक पाठ करणे

मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण, शिवस्तुती, शिव अष्टक, शिव चाळीसा आणि शिव श्लोक पाठ करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. व्रत पाळणाऱ्यांनी या दिवशी अन्न खाऊ नये. संध्याकाळी फळे खा. दुसऱ्या दिवशी भोलेनाथाची पूजा करुन दान केल्यानंतरच उपवास सोडावा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More