Marathi News> भविष्य
Advertisement

Money Plant घरात ठेवताना कधीच करू नका 'या' 5 चुका

मनी प्लांट ठेवण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात हे झाड असेल तर ही बातमी महत्त्वाची

Money Plant घरात ठेवताना कधीच करू नका 'या' 5 चुका

मुंबई : घरात लहान मोठी झाडं आपण लावत असतो. त्यामध्ये आपल्या घरात एक मनी प्लांट देखील आपण ठेवतो. ज्यामुळे घरात समृद्धी आणि आर्थिक वृद्धी व्हावी असा यामागचा हेतू असतो. मनी प्लांट लावताना काही चुका करू नका ज्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

मनी प्लांटला जास्त ऊन चालत नाही. त्यामुळे सावलीच्या ठिकाणी हे झाड ठेवावं. ऊन लागणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे घरात हे झाड ठेवावं. त्याचे फायदे अनेक मिळतील. 

मनी प्लांट कधीच जमिनीवर ठेवू नये. त्यामुळे झाड वेगानं वाढतं असं म्हटलं जातं. हे वास्तू आणि शास्त्राच्या दृष्टीनं शुभ मानलं जात नाही. त्यामुळे दोरीच्या मदतीने त्याला टांगावं. 

मनी प्लांट कधीच उपहार म्हणून देऊ नये. त्यामुळे घरातील सुख शांती भंग होते, आर्थिक संकट ओढवतं असं म्हटलं जातं. त्यामुळे चुकूनही मनी प्लांट कोणालाही गिफ्ट करू नका. 

सुख-समृद्धी आणि कुटुंबात शांतता राखण्यासाठी मनी प्लांट योग्य दिशेला हे झाड ठेवणं गरजेचं आहे. जर तुमची दिशा चुकली तर कर्ज आणि आर्थिक अडचणींचं संकट ओढवू शकतं. उत्तर-पूर्व दिशेला हे झाड ठेवू नये. त्यामुळे नकारात्मकता वाढते. दक्षिण-पूर्व दिशेला मनी प्लांट ठेवावं.

या झाडाची पानं सुकणं कठीच चांगलं नाही. जर झाडाची पानं सुकायला लागली तर घरात संकट येऊ शकतं. त्यामुळे याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. 

Read More