Marathi News> भविष्य
Advertisement

घरात 'या' ठिकाणी ठेवा Money Plant, पडेल पैशाचा पाऊस

घरात आणि ऑफिसमध्ये या ठिकाणी ठेवा Money Plant. पैसा, सुख आणि समाधान तुमच्या ठिकाणी सतत नांदेल. त्यामुळे हे झाड नक्की कुठे लावावं, हे जाणून घ्या?

घरात 'या' ठिकाणी ठेवा Money Plant, पडेल पैशाचा पाऊस

मुंबई : वास्तुशास्त्रात काही झाडं लकी मानली जातात. ही झाडं घरी लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच तुमचं नशिब फळफळणार आहे. असंच एक झाड म्हणजे मनी प्लांट. याला सौभाग्याचं आणि श्रीमंतीचं प्रतिक मानलं जातं. मनी प्लांट घरी लावल्यानंतर कुटुंब सुखी आणि प्रसन्न राहतं. 

पैशाची भरभराट 

ज्या घरांमध्ये वास्तुदोष आहे अशा घरांमध्ये बांबूचे रोप लावण्याची शिफारस वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ करतात. कारण ही वनस्पती वातावरण शुद्ध करते आणि घरात सकारात्मक उर्जा पसरवते. घरामध्ये सुख, शांती आणि आर्थिक समृद्धीसाठी पूर्व दिशेला लावावे. याशिवाय ड्रॉईंग रूम, लिव्हिंग रूम किंवा घरातील लोक जिथे उठतात, बसतात तिथेही लावता येतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते.

घरी कुठे लावाल हे झाड 

मनी प्लांट ठेवताना त्याला योग्य ती जागा द्यावी. हे झाडं घरातील अशा ठिकाणी लावावं जेथे ऊन येणार नाही. कारण ऊन्हामुळे झाडं खराब होतं. ज्यामुळे घराच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो. 

मनी प्लांट तसं असावं?

बांबूचे रोप म्हणजे मनी प्लांट वास्तू शुद्ध करणारे म्हणूनही काम करते. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी बांबूची झाड म्हणजे मनी प्लांट उपयुक्त आहेत. अशा परिस्थितीत 2-3 फूट उंचीपर्यंत वाढणारी बांबूची रोपे लावणे योग्य ठरेल.

ऑफिसमध्ये अधिक लाभदायक 

ऑफिसमध्ये बांबूचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे कार्यालयात लावताना त्यात वेळोवेळी पाणी ठेवावे. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते.

Read More