Marathi News> भविष्य
Advertisement

Budh-Shukra Yuti: मे महिन्याच्या अखेरीस होणार बुध-शुक्राची युती; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

Mercury And Venus Conjunction In Taurus: बुध ग्रहाच्या गोचरमुळे शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा संयोग वृषभ राशीत होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.

Budh-Shukra Yuti: मे महिन्याच्या अखेरीस होणार बुध-शुक्राची युती; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

Mercury And Venus Conjunction In Taurus: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा एका राशी दोन ग्रहांचा संयोग निर्माण होतो. दरम्यान याचा परिणाम मानवी जीवनावर आणि जगावर दिसून येतो. आगामी काळात शुक्र ग्रह सध्या वृषभ राशीत भ्रमण करत असून 31 मे रोजी ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 

बुध ग्रहाच्या गोचरमुळे शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा संयोग वृषभ राशीत होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी सकारात्मक परिणाम मिळणार आहे. 

मेष रास (Aries Zodiac)

शुक्र आणि बुध यांचा या राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळतील. नशिबाने साथ दिल्यास तुमचे अपूर्ण काम पूर्ण होऊन आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. जर तुम्ही बँकिंग, मीडियाशी संबंधित कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या काळात चांगला नफा मिळू शकतो.

कन्या रास (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि बुध यांचे संयोग शुभ ठरू शकतात. या काळात वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन चांगले राहणार आहे. व्यवसायाचा विस्तार होईल आणि व्यवसायाची विश्वासार्हताही वाढेल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. 

मकर रास (Makar Zodiac)

शुक्र आणि बुध यांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचा आनंद वाढेल आणि तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील मिळेल. नोकरदारांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळू शकते. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More