Marathi News> भविष्य
Advertisement

15 जानेवारीला 'या' वेळेत मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त

जाणून घ्या शुभ वेळ 

15 जानेवारीला 'या' वेळेत मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त

मुंबई : इंग्रजी वर्षात पहिला सण येतो तो 'मकर संक्रांत'. दरवर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जायची. मात्र यंदा हा सण 15 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांत यामध्ये 'मकर' शब्द हा मकर राशीचा आहे. या दिवशी मकर राशीत सूर्य प्रवेश करतो.  

एका राशीतून दुसर्‍या राशीत सूर्याच्या जाण्याला 'संक्रांती' असं म्हणतात. मकर संक्रांतीमधील, 'मकर' हा शब्द मकर राशीचे प्रतीक आहे व 'संक्रांती' म्हणजे संक्रमण. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला 'मकर संक्रांती' म्हणतात.

2020 मध्ये 14 जानेवारी रोजी रात्री 2.21 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. याच कारणास्तव यंदा मकर संक्रांती यंदा बुधवारी, 15 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे.

मकर संक्रांत पुजा मुहूर्त -

संक्रांतीची वेळ - 7.19 वाजता 15 जानेवारी रोजी 

पुण्य काळ मुहूर्त : 07.19. 14 ते 12. 31 (कालावधी : 5 तास 14 मिनिटे)

महापुण्य काल मुहूर्त : 07.15.14 ते 09.15.14 (कालावधी : 2 तास 0 मिनिटे)

संक्रांत क्षण : 01.53.48

मकर संक्रांतीचं महत्व 

या दिवशी सूर्य आपला मुलगा शनिदेवसोबतचा राग विसरून पुन्हा घरी परतात. या दिवशी नदीत स्नान करून पूजा अर्चा करून दान केल्याने त्या व्यक्तीच्या पुण्याईत अगणित वाढ होते. या दिवशी शुभ दिवस सुरू होतात. हा खास दिवस सुख आणि समृद्धीचा शुभ दिवस म्हणून साजरा केला जातो. 

Read More