Marathi News> भविष्य
Advertisement

हळदीकुंकू विशेष : महिलांनो अजून हळदीकुंकू समारंभ केलं नाही? 'हा' आहे शेवटचा दिवस

Ratha Saptami 2024 :  महिलांनो तुम्ही अजून हळदीकुंकूचा समारंभ केला नसेल तर आजचा रविवारचा मुहूर्ताला करुन घ्या. कारण हळदीकुंकूसाठी काही दिवसच उरले आहेत. 

हळदीकुंकू विशेष : महिलांनो अजून हळदीकुंकू समारंभ केलं नाही? 'हा' आहे शेवटचा दिवस

Ratha Saptami 2024 :  मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला घरोघरी किंवा सार्वजनिक हळदीकुंकूवाचा (Haldi Kunku) कार्यक्रम करतात. तुम्ही अजून हळदीकुंकू समारंभ केला नसेल तर आजच हा कार्यक्रम करुन घ्या. कारण हळदीकुंकू समारंभासाठी काही दिवस उरले आहेत. आज असंख्य महिला या कामासाठी घराबाहेर जातात. त्यामुळे सुट्टीचा दिवशी त्या इतर कार्यक्रम किंवा घरातील समारंभ ठरवतात. तुम्हीही अजून हळदीकुंकू केलं नसेल तर आज रविवारी महिलांना बोलवून त्यांना वाण द्या. कारण येत्या आठवड्यात रथसप्तमी आहे. त्यामुळे ऑफिसमधून आल्यानंतर तुम्हाला हळदीकुंकूचा कार्यक्रम करावा लागेल. त्याशिवाय तुम्ही सुट्टी घेऊन हळदीकुंकूचा कार्यक्रम करु शकता. (Ladies haven t done the Haldi Kunku ceremony yet This is the last day 16 february ratha saptami 2024)

कधीपर्यंत करता येणार हळदीकुंकू?

मकर संक्रांतीपासून सुरु झालेला हळदीकुंकूचा कार्यक्रम हा येत्या शुक्रवारी 16 फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे. कारण 16 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे. धार्मिक शास्त्रानुसार रथसप्तमी तिथीपर्यंतच हळदीकुंकूचा समारंभ करता येत असतो. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 15 फेब्रुवारीला सकाळी 10.12 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी सकाळी 8.54 वाजेपर्यंत आहे. उदय तिथीनुसार रथ सप्तमी ही 16 फेब्रुवारी करायची आहे. 

रथ सप्तमीला 2024 काय करतात?

रथ सप्तमी म्हणजे सूर्य जयंती असते. यादिवशी सूर्यदेवाची पूजा करण्यात येते. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने मानवाला शाश्वत संपत्ती प्राप्त होते आणि सूर्यदेवाची कृपा अबाधित राहते, असं धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून त्यांची पूजा केल्याने जीवनातील अनेक संकटं दूर होतात आणि विशेष फळही प्राप्त होते, अशीही मान्यता आहे. रथ सप्तमीच्या दिवशी मनुष्याने सूर्योदयापूर्वी स्नान करुन व्रत करावे, असं सांगण्यात आले आहे. रथ सप्तमीला स्नान करण्यासाठी सकाळी 05:17 ते 06:59 हा शुभ मुहूर्त असणार आहे. तर यादिवशी ब्रह्म योग आणि इंद्र हे शुभ योग असणार आहे. 

रथ सप्तमीला 'या' सूर्य मंत्राचा जप करा! 

ॐ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य:
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ।
ॐ सूर्याय नम: ।
ॐ घृणि सूर्याय नम: ।
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।
ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More