Marathi News> भविष्य
Advertisement

Kendra Tirkon Rajyog: केंद्र त्रिकोण राजयोगाने 3 राशींचं नशीब चमकणार; शनीदेवाची राहणार कृपा

Kendra Tirkon Rajyog : ग्रह वेळोवेळी राशी बदलून शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसून येतो. शनिदेवाने मूळ त्रिकोण कुंभ राशीत प्रवेश केला आहे. 

Kendra Tirkon Rajyog: केंद्र त्रिकोण राजयोगाने 3 राशींचं नशीब चमकणार; शनीदेवाची राहणार कृपा

Kendra Tirkon Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या चालीमध्ये बदल करतात. ग्रह वेळोवेळी राशी बदलून शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसून येतो. 

शनिदेवाने मूळ त्रिकोण कुंभ राशीत प्रवेश केला आहे. दरम्यान यावेळी काही राशींच्या लोकांचा याचा फायदा होणार आहे. यामध्ये 3 राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कुंभ रास

तुमच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास यावेळी वाढू शकतो. तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. यावेळी बौद्धिक स्तरावर विकास होणार आहे. प्रगतीचा मार्ग खुला होईल. या योगाची दृष्टी तुमच्या वैवाहिक जीवनातील भावनांवर पडत आहे. कौटुंबिक वातावरणाच्या दृष्टीने हा काळ चांगला जाणार आहे. 

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग अनुकूल ठरणार आहे. यावेळी तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू शकता. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ संधी घेऊन येईल. विरोधकांचे मनसुबे धुळीत मिळतील. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. यावेळी तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. या काळात आर्थिक सुधारणा होईल.

सिंह रास

केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. वडिलोपार्जीत मालमत्तेचे प्रकरण मार्गी लागेल. भागीदारी कार्य सुरू करू शकता. नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील. जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न होईल.  तुम्हाला कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठी वेळ लाभदायक आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More