Marathi News> भविष्य
Advertisement

Kaal Sarp Dosh : कसा तयार होतो कालसर्प दोष? दोष दूर करण्यासाठी करा 'हे' महाउपाय

Kaal Sarp Dosh : सर्व राशिच्या जातकांच्या कुंडात वेळोवेळी अनेक प्रकारचे योग निर्माण होतात. यामधील काही योग शुभ असतात आणि काही अशुभ माने जातात. या सर्वांमध्ये कालसर्प दोष हा अत्यंत विनाशकारी मानला जातो. 

Kaal Sarp Dosh : कसा तयार होतो कालसर्प दोष? दोष दूर करण्यासाठी करा 'हे' महाउपाय

Kaal Sarp Dosh : ज्योतिष शास्त्रामध्ये काल सर्प दोष फार अशुभ मानलं जातं. सर्व राशिच्या जातकांच्या कुंडात वेळोवेळी अनेक प्रकारचे योग निर्माण होतात. यामधील काही योग शुभ असतात आणि काही अशुभ माने जातात. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे कुंडलीमध्ये दोष निर्माण होतो. जो प्रभाव काही राशींच्या जीवनावर नकारात्मक रूपात पडताना दिसतो.

काल सर्प दोष

या सर्वांमध्ये कालसर्प दोष हा अत्यंत विनाशकारी मानला जातो. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो त्यांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. यासाठीच कालसर्प दोषाची विधीपूर्वक पूजा करणं अत्यंत आवश्यक आहे.

कालसर्प दोषाची लक्षणं काय असतात?

ज्योतिषाचार्यांच्या म्हणण्यानुसार, की कालसर्प दोष निर्माण झाल्यामुळे त्या राशीच्या व्यक्तींना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. याचं एक लक्षण असंही मानलं जातं की, ज्या लोकांना स्वप्नात मृत्यू किंवा साप दिसतो त्यांना याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हा दोष निर्माण झाल्यामुळे मुलांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते.

कसा तयार होतो कालसर्प दोष?

ज्योतिष शास्त्रानुसार, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा काल सर्प दोष तयार होतो.

काय आहेत यावरील उपाय?

ज्योतिष्य शास्त्रानुसार, श्रावण महिन्यात दुधात पाणी मिसळून ते भगवान शंकराला अर्पण करावं. याशिवाय महामृत्युंजय मंत्राचा जप रोज किमान 5 वेळा करावा. त्याचप्रमाणे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. यावेळी या झाडाची किमान 7 वेळा प्रदक्षिणा करावी. असं केल्याने या दोषाचा प्रभाव कमी होतो, असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना याचा त्रास होतो, त्यांनी नियमितपणे भगवान विष्णूची पूजा करावी.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More