Marathi News> भविष्य
Advertisement

Janmashtami 2021 : जन्माष्टमी : आजचा शुभ मुहूर्त, पूजा-विधी, चुकूनही करू नका 5 गोष्टी

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त, याचवेळी करा पूजा होईल लाभ 

Janmashtami 2021 : जन्माष्टमी : आजचा शुभ मुहूर्त, पूजा-विधी, चुकूनही करू नका 5 गोष्टी

मुंबई : Janmashtami 2021 भगवान श्री कृष्ण यांचा जन्म भाद्रमासमध्ये कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथी आणि रोहिणी  नक्षत्रावर झाला होता. दरवर्षी भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर भगवान श्री कृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावर्षी 30 ऑगस्टवर जन्माष्टमी साजरी केली जात आहे. हा दिवस संपूर्ण भारतात अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी विधीपूर्वक भगवान श्री कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते. आज उपवास असून शुभ मुहूर्त, नियम आणि पूजा-विधी जाणून घ्या.

पूजेचा शुभ मुहूर्त 

30 ऑगस्टच्या दिवशी रात्री 11 वाजून 59 मिनिटे ते 12 वाजून 44 मिनिटांपर्यंत 

शुभ मुहूर्ताचा एकूण कालावाधी 

45 मिनिटे 

कृष्ण जन्माष्टमी मुहूर्त 

कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त हा रात्री 12 वाजता असेल. रात्री 12 वाजता श्रीकृष्णाच्या जन्मानंतर व्रत सोडावा. काही जण हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकालाच्या दिवशी सोडला जातो. 

उपवास सोडण्याचा कालावधी 

31 ऑगस्ट रोजी म्हणजे गोपाळकालाच्या दिवशी सकाळी 9 वाजून 44 मिनिटांने हे व्रत सोडावे. 

रोहिणी नक्षत्र प्रारंभ- 30 ऑगस्ट सकाळी 06 वाजून 39 मिनिटे
रोहिणी नक्षत्र समाप्त - 31 ऑगस्ट रोजी सकाळी 09 वाजून 44 मिनिटे

पूजा विधी करताना हे नियम कटाक्षाने पाळा 

या पवित्र दिवशी भगवान श्री कृष्णाची पूजा करण्याबरोबरच गाईचीही पूजा करा. श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबतच गायीची मूर्ती पूजास्थळी ठेवा. सुंदर आणि स्वच्छ आसनात बसून पूजा करावी. भगवान श्रीकृष्णाला गंगेच्या पाण्याने अभिषेक करा.
गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप वापरा.

जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही करू नका 5 गोष्टी 

- जे जन्माष्टमीचे उपवास करीत आहेत त्यांनी रात्री 12 वाजेपूर्वी उपवास सोडू नये, अन्यथा त्यांना उपवासाचे फळ मिळणार नाही. कृष्णाच्या जन्मानंतर त्याची पूजा केल्यानंतर, त्याला भोग अर्पण केल्यानंतरच ते उघडा.

- ज्यांचा जन्माष्टमीचा उपवास नाही त्यांनी या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत किंवा सूडाचे अन्न खाऊ नये. आज भात, जव, कांदा आणि लसूण खाऊ नका.

- जरी गाईला कधीही दुखवू नये, परंतु या दिवशी गाईला त्रास देणे जीवनात मोठ्या अडचणी आणू शकते कारण गाय भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे.

- जन्माष्टमीच्या दिवशी झाडे तोडू नका कारण कान्हाला झाडे आवडतात.

- या दिवशी कोणाचा अपमान करू नका. भगवान श्रीकृष्ण त्याचा गरीब मित्र सुदामावर खूप प्रेम करायचे, त्याच्या दृष्टीने गरीब आणि श्रीमंतांना समान स्थान होते.

Read More