Marathi News> भविष्य
Advertisement

'या' 3 वाईट सवयी तुमचं नुकसान करतायत... कसं ते जाणून घ्या

आपण हे बऱ्याचदा ऐकलं आहे की, लोक म्हणतात तुम्ही काहीही केलं तरी याचं फळ तुम्हाला याच जन्मात फेडावं लागतं.

'या' 3 वाईट सवयी तुमचं नुकसान करतायत... कसं ते जाणून घ्या

मुंबई : आपण हे बऱ्याचदा ऐकलं आहे की, लोक म्हणतात तुम्ही काहीही केलं तरी याचं फळ तुम्हाला याच जन्मात फेडावं लागतं. त्यामुळे हे तर निश्चित की तुम्ही जे पेरणार तेच उगवणार. त्यामुळे आपल्या हे नेहमी सांगितले जाते की, चांगले कर्म करा. त्याचा तुमच्या आयुष्यावरती परिणाम होईल. तसेचं तुमचं वागणं आणि तुमच्या सवयींचा परिणाम तुमच्या राशी आणि ग्रहांवरती देखील होतो, ज्यामुळे आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलतात.

तुमच्या चांगल्या सवयी ग्रह मजबूत करतात, तर वाईट सवयी ग्रहांना कमकुवत करण्याचे काम करतात. ज्योतिष शास्त्रानुसार अशा काही वाईट सवयी असतात, ज्यामुळे खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही, ऐवढेच काय तर यामुळे तुम्हाला पैशाशी संबंधित नेहमीच समस्या राहतील.

चला तर मग तुमच्या सवयींचा ज्योतिषशास्त्राशी काय संबंध आहे, हे जाणून घेऊया.

या सवयी सोडून द्या

1- बसल्यावर पाय हलवण्याची सवय : काही लोकांना एका जागेव बसल्यावर पाय हलवण्याची सवय असते, परंतु तुम्हाला माहितीय, अशा लोकांच्या राशीतील चंद्र कमजोर असतो. त्यांच्या मनात नेहमी काही ना काही गोष्‍ट फिरत असतात.

तसेच अशा लोकांना मानसिकदृष्ट्या कमकुवत मानले जाते. ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात नेहमीच तणाव राहातो. जर तुम्ही ही सवय सोडली तर तुमची मानसिक स्थिती चांगली राहील, ज्यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहील. ऐवढेच काय तर समोरच्याला देखील तुम्ही फार कॉन्फिडंट दिसाल.

2- नखे चघळण्याची सवय : नखे चावण्याची सवय अनेक लोकांना आहे. जे लोक नख चावताता आणि चघळतात, अशा लोकांच्या राशीतील सूर्य अशक्त होत जातो. अशा लोकांना डोळ्यांची समस्या असते, त्यांना विनाकारण अपयश येते. ही सवय सोडली तर तुमचा आदर वाढेल आणि तुमची दृष्टीही चांगली राहील.

3- घरात सिस्टमॅटीक सामान ठेवा : ज्या लोकांच्या घरी काही नियम नसतील, ते त्या सिस्टीमनुसार चालत नसतील, तर हे त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे. म्हणजेच ज्यांच्या घरात कुठेही कपडे, चप्पल किंवा वस्तु फेकून दिलेल्या असतील तर अशा लोकांच्या राशीतील शनी कमजोर होतो आणि त्यामुळे त्यांना शनीच्या कोपाला सामोरं जावं लागतं. ज्यामुळे अशा व्यक्तींच्या करिअरमध्येही अडचणी येतात. अशा लोकांच्या घरात चोरीच्या घटनाही घडतात. त्यामुळे तुमचं घर साफ आणि स्वच्छ ठेवा. घरचे काही नियम बनवा.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.)

Read More