Marathi News> भविष्य
Advertisement

'ही' फुले घरात असतील तर अत्यंत शुभ, नात्यात वाढतो गोडवा

प्रेमाची सुरुवात गुलाबाच्या फुलाने होते, पण गुलाबाच्या फुलासोबतचं 'या' सुगंधीत फुलांमुळे वाढेल तुमच्या नात्यातील गोडवा  

'ही' फुले घरात असतील तर अत्यंत शुभ, नात्यात वाढतो गोडवा

मुंबई : कोणत्याही नात्याची सुरुवात फुलांमुळे होते. एखाद्याला भेट देण्यासाठी फुलगुच्छा एक योग्य पर्याय आहे. त्याचप्रमाणे वास्तूशास्त्रात देखील फुलांना प्रचंड महत्त्व आहे. अशी काही फुले आहेत, ज्यांच्यामुळ नात्यातील गोडवा वाढतो. वास्तुशास्त्रात वनस्पती आणि फुलांचे विशेष महत्त्व सांगितलं आहे. घराच्या अंगणात फुले असल्याने सकारात्मकता येते. यासोबतच नात्यात शांतता आणि गोडवाही येतो. आज आपण अशाच काही फुलांबद्दल जाणून घेणार आहोत, जे घरी लावल्याने नात्यात प्रेम आणि गोडवा वाढतो.

चंपा, चमेली आणि चंदन

fallbacks

फुलांची झाडे लावल्याने नातेसंबंध मजबूत होतात असे वास्तू तज्ञ सांगतात. त्यांना घरात सतत पाहिल्याने मनात सकारात्मक विचार येतात. नवविवाहित जोडप्यासाठी पांढरी फुले शुभ मानली जातात असे मानले जाते. त्यांना दक्षिण दिशेला ठेवणे खूप शुभ मानले जाते.

पेओनिया फुले

fallbacks

Peonia फुलांची राणी मानली जाते. वास्तुशास्त्रात याला प्रेम आणि रोमान्सचे प्रतीक मानलं जातं. असे मानले जाते की विवाहयोग्य मुलींनी त्यांच्या घराच्या ड्रॉईंग रूममध्ये हे रोप लावावे. यामुळे कुटुंबाचे सौभाग्य वाढते आणि आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री होते.

सदाबहार फुले-

fallbacks

नाती मजबूत करण्यासाठी आणि नात्यात गोडवा आणण्यासाठी घरात सदाहरित वनस्पती लावा. सदाबहार फुलाचं झाड घराबाहेर लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात राहत नाही. तसेच, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम कायम राहते.

लाल गुलाब-

fallbacks

लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानलं जातं. घरातील बागेत गुलाब लावल्याने जीवनात आनंद येतो. नात्यातील कडूपणा दूर करण्यासाठी एका भांड्यात लाल गुलाबाच्या पाकळ्या टाकून पाण्यात ठेवाव्यात, असे वास्तुतज्ज्ञांचे मत आहे. ज्यामुळे घरातील कलह दूर करण्यासाठीही हा उपाय केला जाऊ शकतो.

 

Read More