Marathi News> भविष्य
Advertisement

Horoscope 5 April 2022: मंगळवारी सूर्यासारखं चमकेल या राशींच्या व्यक्तींचं नशीब

जाणून घ्या कसं आहे तुमचं आजचं राशीभविष्य.    

Horoscope 5 April 2022: मंगळवारी सूर्यासारखं चमकेल या राशींच्या व्यक्तींचं नशीब

मेष (Aries): जवनात पुढे जाण्यासाठी मार्ग शोधाल. अडचणी दूर होतील. थोर व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होवू शकतो. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ (Taurus) : व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस आहे. ज्यामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठा बदल होवू शकतो. दिवस चांगला आहे. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. 

मिथुन (Gemini): दुसऱ्यांच्या हिताचा विचार कराल. तुम्ही नवीन भागीदारी किंवा असोसिएशनमध्ये प्रवेश करू शकता. तुमच्या नवीन कल्पना आणि कार्यशैलीचं कौतुक होईल. व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क (Cancer): कामासाठी नव्या उमेदीने सुरुवात कराल. ज्यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे, त्यांना अधिक नफा होण्याची शक्यता आहे. राहीलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण करू शकाल.

सिंह (Leo): आज दुसऱ्यांना सल्ला देणं टाळा. व्यवसायिकांची मोठ डिल यशस्वी होवू शकते. आर्थिक स्थिती संभाळण्यासाठी प्रयत्न करा. तरुणांना अधिक गोष्टी शिकण्याची गरज आहे. 

कन्या (Virgo):  दुसरे काय संगत आहे, ते लक्ष देवून ऐका. इतरांना दिलेले पैसे आज मिळण्याची शक्यता आहे. आवश्यक खर्चात कपात करा. क्षेत्रात बदल करू शकता. कोणत्या मोठ्या कार्यक्रमात मित्रांकडून सहयोग लाभेल. 

तूळ (Libra): अपेक्षांसोबत दिवस सुरू होईल. चांगली घटनेमुळे जीवनाला नवी दिशा मिळेल. व्यवसायामध्ये लाभ होवू शकतो. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक (Scorpio): दिवस आनंददायी असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं आणि तुमचं वरिष्ठांकडून कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळणार आहे. तुमचा पैसा योग्य कामात खर्च होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील पण मनात भीती राहील. 

धनु (Sagittarius):  तुमचा आजचा संपूर्ण दिवस उत्साहात जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तसंच तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. तुमचा दिवस चांगला जाईल. 

मकर (Capricorn): दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये कोणती कला दडलेली आहे... यावर लक्ष केंद्रीत करा. नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक कार्यात लक्ष द्या.. आरोग्याकडे लक्ष द्या..

कुंभ (Aquarius): स्वतःचं मत मांडण्यासाठी संधी मिळेल. कुटुंबातील एखादा व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय निवडण्याची अत्यंत गरज आहे. वायफळ खर्च करू नका. 

मीन (Pisces): घर आणि प्रेम दोघांना समजून घ्यावं लागेल. कोणत्या प्रोजेक्टवर रिसर्चचं काम हाती घेवू शकता. न्यायालयीन काम पूर्ण होवू शकतात. आज तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल... आरोग्याकडे लक्ष द्या. 

Read More