Marathi News> भविष्य
Advertisement

Horoscope 3 April 2022: रविवारी सूर्यासारखं चमकेल 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब

जाणून घ्या कसं आहे तुमचं आजचं राशीभविष्य.    

Horoscope 3 April 2022: रविवारी सूर्यासारखं चमकेल 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब

मेष (Aries): आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकेल. थोर व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होवू शकतो. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ (Taurus) : घर आणि प्रेम दोघांना समजून घ्यावं लागेल. कोणत्या प्रोजेक्टवर रिसर्चचं काम हाती घेवू शकता. न्यायालयीन काम पूर्ण होवू शकतात. आज तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल... आरोग्याकडे लक्ष द्या. 

मिथुन (Gemini): सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. तुमच्या विश्वासामुळे नाती अधिक घट्ट होतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसाठी आज दिवस उत्तम आहे. उत्पन्न चांगलं राहील. लवकर यश मिळेल. 

कर्क (Cancer): स्वतःचं मत मांडण्यासाठी संधी मिळेल. कुटुंबातील एखादा व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय निवडण्याची अत्यंत गरज आहे. वायफळ खर्च करू नका. 

सिंह (Leo): दुसरे काय संगत आहे, ते लक्ष देवून ऐका. इतरांना दिलेले पैसे आज मिळण्याची शक्यता आहे. आवश्यक खर्चात कपात करा. क्षेत्रात बदल करू शकता. कोणत्या मोठ्या कार्यक्रमात मित्रांकडून सहयोग लाभेल. 

कन्या (Virgo): आजच्या दिवशी तुमच्या प्रयत्नांना फळ मिळणार आहे. तुम्ही नवीन भागीदारी किंवा असोसिएशनमध्ये प्रवेश करू शकता. तुमच्या नवीन कल्पना आणि कार्यशैलीचं कौतुक होईल.

तूळ (Libra): व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस आहे. ज्यामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठा बदल होवू शकतो. दिवस चांगला आहे. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. 

वृश्चिक (Scorpio): दिवस आनंददायी असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं आणि तुमचं वरिष्ठांकडून कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळणार आहे. तुमचा पैसा योग्य कामात खर्च होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील पण मनात भीती राहील. 

धनु (Sagittarius):  तुमचा आजचा संपूर्ण दिवस उत्साहात जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तसंच तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. तुमचा दिवस चांगला जाईल. 

मकर (Capricorn): अपेक्षांसोबत दिवस सुरू होईल. चांगली घटनेमुळे जीवनाला नवी दिशा मिळेल. व्यवसायामध्ये लाभ होवू शकतो. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. 

कुंभ (Aquarius): दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये कोणती कला दडलेली आहे... यावर लक्ष केंद्रीत करा. नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक कार्यात लक्ष द्या.. आरोग्याकडे लक्ष द्या..

मीन (Pisces): रागावर नियंत्रण ठेवा. छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करा. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. ते ऑनलाइन व्यवसाय करतात, त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना आखल्या पाहिजेत. रखडलेली योजना पुन्हा सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे.

 

Read More