Marathi News> भविष्य
Advertisement

राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता

असा असेल तुमचा आजचा दिवस

राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता

मेष- जी कामं कराल त्याचा फायदाच होणार आहे. कामातून अर्थार्जनाची संधी आहे. कागदोपत्री व्यवहार पूर्ण करा. प्रवासयोग आहेत. कोणाशी वाद असतील तर काही प्रतिक्रिया देऊ नका. 

वृषभ- दैनंदिन कामांचा व्याप जास्त असेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचा विचार कराल. आरोग्य उत्तम असेल. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. धैर्याने पाऊल उचला. दिवसभर पैशांचाच विचार करत राहाल. जमिनीच्या गोष्टी फायद्याच्या ठरणार आहेत.  

मिथुन- जुनी कामं आटोपण्याचा तुम्हालाच फायदा होईल. जुनी कामं पूर्ण करण्यावर लक्ष द्या. घनिष्ट मैत्री असलेली व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. ज्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. मेहनत करा, फळ मिळेल.  

कर्क- आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. काही वाद लगेचच सोडवू शकाल. व्यवहारकौशल्य, सहनशक्तीच्या बळावर जास्तीत जास्त गोष्टींचे प्रश्न आपोआपच सुटतील. दुसरे काय म्हणतात हे ऐकणं गरजेच आहे. प्रत्येकवेळी तुम्हीच बरोबर असाल असे नाही. अचानक धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. अडकलेले पैसे मिळण्याची चिन्हं आहेत. 

सिंह- अपेक्षांच्या बाबतील संतुलित असाल. वरिष्ट तुमच्या कामाने प्रभावित असतील. नोकरीच्या ठिकाणी असणारा तणाव कमी होईल. सध्याच्या स्थितीत काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. तुम्हाल्या देखील योग्य सल्ला मिळण्याची गरज आहे. ज्यामुळे तुम्हालाही आनंद मिळेल. महत्त्वाकांक्षी असाल. 

कन्या- नोकरी आणि व्यापारात नवी पावलं उचलालय कामात नवे प्रयत्न करा, त्यात यशस्वी व्हाल. दिवस चांगला आहे. ज्या गोष्टींचा विचार करताय त्यात यश मिळेल. साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. दैनंदिन कामं पूर्ण होतील. दुसऱ्यांच्या राजकारणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. 

तुळ- विचारात असणारी कामं सुरू करा. फायदाच होईल. दिवस चांगला आहे. सामूहिक आणि सामाजिक कामांसाठी दिवस चांगला आहे. मित्रांना जास्त वेळ द्याल. गुंतवणूकीचे बेत आखाल. धनलाभ होऊ शकतो. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. 

वृश्चिक- उत्साही असाल. नव्या व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. अनेक लोकं तुमच्या मदतीसाठी तयार असतील. कोणाची मदत करण्याआधी स्वत:चं हातातलं काम पूर्ण करा. नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नव्या नोकरीत बढती मिळू शकते.  

धनु- समजूतदारपणाचा वापर करा. कामाच्या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तींची मदत होईल. नवे करार फायद्याचे ठरतील. दिवस चांगला असेल. नशिबाची साथ आहे. अडकलेले पैसे मिळतील. तुमच्यासाठी आजचा दिस खास असेल. काही असे प्रसंग समोर येतील ज्याचा तुम्हाला फायदा होईल. 

मकर- धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. दुसऱ्यांच्या सुचनांचा आदर करणं गरजेच आहे. प्रदीर्घ काळासाठी चालणाऱ्या एखाद्या कामाचा फायदाच होईल. अनेक विचार आणि योजना आखाल. बुद्धीचातुर्याने कामं पूर्ण कराल. अविवाहितांचे विवाह प्रस्ताव मार्गी लागतील. मित्र आणि कुटुंबाचं सहकार्य लाभेल. शुभवार्ता कळेल. आनंदी असाल. बेरोजगारांसाठी दिवस चांगला असेल. 

कुंभ- जुन्या अडचणी दूर होतील. स्वत:वर लक्ष द्या. दुसरे काय सांगतात ते ऐका. नवे कपडे खरेदी करा. जास्तीत जास्त प्रमाणात सक्रिय असाल. समाज आणि कुटुंब अशा दोन्हीकडील महत्त्वाची कामं पूर्ण कराल. अनेक कल्पना सुचतील. खर्चांवर ताबा ठेवा. यशस्वी होण्यासाठी धीर राखा. मित्रांची मदत मिळेल.  

मीन- दोघांच्या भांडणात फसण्याची शक्यता आहे. समस्या सोडवण्यासाठी त्यात उतरावं लागेल. कामाच्या व्यापासोबतच जबाबदारी वाढेल. दिवस व्यग्र असेल. व्यापाराच्या काही जबाबदाऱ्या पार पाडाल. नोकरीच्या ठिकाणी शांतता असेल. अडचणींचा सामना करण्यासाठी योजना आखाल.  

Read More