Marathi News> भविष्य
Advertisement

Horoscope 22 March 2022: मंगळवारी 'या' राशीच्या व्यक्तींनी आरोग्याबाबत सावधान रहावं

जाणून घ्या कसं आहे तुमचं आजचं राशीभविष्य.

Horoscope 22 March 2022: मंगळवारी 'या' राशीच्या व्यक्तींनी आरोग्याबाबत सावधान रहावं

मुंबई : सिंह राशीच्या लोकांचा मंगळवारी संपूर्ण दिवस उत्साहात जाणार आहे. दुसरीकडे, धनू राशीच्या व्यक्तींना आज पूर्णपणे त्यांच्या नशीबाची साथ मिळणं कठीण आहे. तर जाणून घ्या कसं आहे तुमचं आजचं राशीभविष्य.

मेष : मंगळवारच्या दिवशी तुम्हाला कामाच्या क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळणार आहे. तुमचा पैसा योग्य कामात खर्च होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील. मात्र यावेळी त्यांच्या मनात भीती राहील. 

वृषभ: आजच्या दिवशी तुमची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही दिवस अस्वस्थतेत जाईल. तुम्ही जे काम कराल त्यामध्ये कोणाचं तरी सहकार्य लाभेल. तुम्ही हुशारी वापरून काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. 

मिथुन : मंगळवारच्या दिवसाची सुरुवात आनंदाने होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. यासोबतच तुम्हाला नोकरीत चांगले पैसे मिळतील. 

कर्क : या मंगळवारी तुम्हाला पूर्णपणे नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता असून कामामध्ये लाभाची स्थिती राहील. तुमचा संपूर्ण दिवस मजेत जाणार आहे.

सिंह : तुमचा आजचा दिवस उत्साहात जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. आजच्या दिवशी तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. तुमचा दिवस चांगला जाईल. तर मंगळवारी तुमचे नशीब चांगले राहील.

कन्या : मंगळवारी तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायासाठी तुमचा दिवस चांगला जाईल. तुमच्या कामाच्या क्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. 

तूळ: या मंगळवारी तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये यश मिळणार आहे.

वृश्चिक : मंगळवारी तुम्हाला अस्वस्थ वाटेल. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात राहणार नाही. नोकरी करणारे लोक नोकरीतील अडथळ्यांमुळे कंटाळा करतील.

धनु : आजच्या दिवशी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही. मात्र, कोर्टाशी संबंधित काही प्रकरणं असतील तर त्यामध्ये तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. तुमची मानसिक सुस्ती संपेल. 

मकर : मंगळवारी तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्वांशी चांगलं वागाल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत मिळेल. आजच्या दिवशी तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. 

कुंभ : आजच्या दिवशी व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहणार आहे. इतर लोकांकडून तुम्हाला आदर मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडूनही तुमची प्रशंसा होईल. 

मीन : मंगळवारी पैशांशी संबंधित बाबी उत्तम राहतील. तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी बोलू शकता. तुमचे मन प्रसन्न राहील.

Read More