Marathi News> भविष्य
Advertisement

Horoscope 12 March 2022: 'या' राशीच्या लोकांची आज खास व्यक्तीशी होणार भेट

जाणून घ्या कसं आहे तुमचं आजचं राशीभविष्य.

Horoscope 12 March 2022: 'या' राशीच्या लोकांची आज खास व्यक्तीशी होणार भेट

मुंबई : शनिवारी सिंह राशीच्या लोकांचं मन प्रसन्न राहणार आहे. दुसरीकडे, तूळ राशीच्या व्यक्ती शुभ कार्यात किंवा समारंभात सहभागी होणार आहेत. जाणून घ्या कसं आहे तुमचं आजचं राशीभविष्य.

मेष (Aries)

तुमचा आजचा दिवस चांगला जाणार. तसंच व्यवसायात फायदा देखील होणार आहे. नोकरीत तुमचं प्रमोशन होऊ शकतं. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील.

वृषभ (Taurus)

शनिवार हा शिक्षणासाठी चांगला दिवस असणार आहे. तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. 

मिथुन (Gemini)

शनिवार तुमच्यासाठी शुभ राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहणार आहे. तसंच तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकता. 

कर्क (Cancer)

या शनिवारी व्यापारी वर्गाला विशेष चांगले परिणाम मिळतील. त्यामुळे धनलाभ होण्याचे योग आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. 

सिंह (Leo)

मांगलिक कार्यासाठी शनिवार शुभ राहील. तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला कोणाला तरी भेटण्याची संधी मिळणार आहे. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. याशिवाय कामात चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo)

शनिवार तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. कामात यश मिळून फायदा होईल. तुम्ही कौतुकास पात्र असाल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात गुंतण्याची शक्यता फार कमी आहे.

तूळ (Libra)

या शनिवारी तुम्हाला कौटुंबिक सुख मिळेल. तुम्ही काही शुभ कार्यात सहभागी व्हाऊ शकता. एखाद्या खास व्यक्तीशी तुमची भेट चांगली असणार आहे. कामासाठी दिवस चांगला आहे. 

वृश्चिक (Scorpio)

शनिवार तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्ही शुभ कार्यात सहभागी होणार आहात. तुम्ही चांगलं काम कराल ज्यामुळे तुमचं कौतुक होईल. 

धनू (Sagittarius)

शनिवारी तुम्ही खूप आनंदी असणार आहात. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि सहकार्य मिळणार आहे.

मकर (Capricorn)

शनिवारला खास बनवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, पण कोर्टाशी संबंधित काही प्रकरणे असतील त्यामध्ये दिलासा मिळेल.

कुंभ (Aquarius)

या शनिवारी तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला कामात यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार कामाच्या योजना पूर्ण कराल. तसंच तुम्हाला कौटुंबिक सुख मिळेल. तुम्ही तुमचं लक्ष चांगल्या कामावर केंद्रित कराल. 

मीन (Pisces)

शनिवारवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीची परिस्थितीही चांगली राहील. शनिवारचा दिवस कार्यक्षेत्रात फायदेशीर ठरेल.

Read More