Marathi News> भविष्य
Advertisement

Navpancham Rajyog: गुरु-केतू मिळून बनवणार 'नवपंचम' राजयोग; 'या' राशी एका रात्रीत होणार मालामाल

Navpancham Rajyog: आगामी 2024 वर्षात मायावी ग्रह केतू कन्या राशीत भ्रमण करणार आहे. या वर्षाच्या मध्यात गुरूसोबत नवपंचम योग तयार होणार आहे. नवपंचम योगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. 

Navpancham Rajyog: गुरु-केतू मिळून बनवणार 'नवपंचम' राजयोग; 'या' राशी एका रात्रीत होणार मालामाल

Navpancham Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या इतर ग्रहांशी संयोग होतो. ग्रहांच्या संयोगाने शुभ आणि राजयोग तयार होतात. असंच येत्या नवीन वर्षात खास राजयोग तयार होणार आहे. 

आगामी 2024 वर्षात मायावी ग्रह केतू कन्या राशीत भ्रमण करणार आहे. या वर्षाच्या मध्यात गुरूसोबत नवपंचम योग तयार होणार आहे. नवपंचम योगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. जाणून घेऊया नवपंचम योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

सिंह रास (Leo Zodiac)

नवपंचम राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. केतू ग्रह 2024 मध्ये तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात जाणार आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. या काळात अडकलेले पैसे मिळण्यासोबतच तुमच्या करिअरमध्ये यश मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. 

कन्या रास (Kanya Zodiac)

नवपंचम राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 2024 मध्ये केतूच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला व्यवसायात नवीन यश मिळणार आहे. कामाकडे बघता नोकरी करणार्‍यांना यशासोबत काही मोठी जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. जर तुम्ही भागीदारीचे काम केले तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकणार आहे. 

तूळ रास (Tula Zodiac)

नवपंचम राजयोग तुमच्यासाठी शुभ असू शकतो. या राजयोगामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि तुम्हाला करिअरशी संबंधित कामात यश मिळू शकणार आहे. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागणार आहेत. यावेळी तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. शेअर मार्केट आणि शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More