Marathi News> भविष्य
Advertisement

Ganesh Chaturthi Remedies : आर्थिक चणचणीमुळे कुटुंब अडचणीत? गणेश चर्तुथीला हे उपाय करा

Ganesh Chaturthi Remedies: आम्‍ही तुम्‍हाला श्रीगणेशाला प्रसन्न करण्‍यासाठी अशाच काही खास उपायांबद्दल माहिती देत ​​आहोत.

Ganesh Chaturthi Remedies : आर्थिक चणचणीमुळे कुटुंब अडचणीत? गणेश चर्तुथीला हे उपाय करा

Ganesh Chaturthi Remedies : राज्यासह देशात मोठ्या गणेश मंडळांमध्ये गणेशाचां आगमन झालंय.  यावेळी 31 ऑगस्टला गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2022) सण साजरा केला जातोय. असे मानले जातं की जर, आयुष्यातील अडचणींमुळे सर्व प्रगतीला खिळ लागत असेल, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी विशेष उपाय करू शकता. आम्‍ही तुम्‍हाला श्रीगणेशाला प्रसन्न करण्‍यासाठी अशाच काही खास उपायांबद्दल माहिती देत ​​आहोत. (financial crisis surrounded family do these remedies on ganesh chaturthi remedies)

गुळाचा वापर

जर तुमचं कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत असेल,  तर तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करा. यानंतर गुळामध्ये देशी तूप मिसळून गणपतीला अर्पण करा. नंतर तो गूळ गाईला खाऊ घाला. तुमच्या या उपायाने श्रीगणेश प्रसन्न होतील आणि तुम्हाला अपेक्षित फळ देतील.

शुद्ध पाण्याने अभिषेक करावा

गणेश चतुर्थीला देशासह जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी गणेशाच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. यासोबतच गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावं. असं मानले जातं की असं केल्याने सिद्धीविनायक भक्तांच्या सर्व अडचणी दूर करतात.

दुर्व्याचा वापर

गणेश चतुर्थीला दुर्व्याचा वापर करु शकता. घरात पिवळ्या रंगाच्या गणेशमूर्तीची स्थापना करा. यादरम्यान श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा जप करा.  यानंतर श्री गजवकत्रम् नमो नमःचा जप करा. त्यानंतर डूब गवताच्या 108 पानांवर ओली हळद लावून गणपतीला अर्पण करावी.

पिवळ्या रंगाची मिठाई

मुलाच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यावर उपायही करू शकता. गणेश चतुर्थीला घरी पिवळ्या रंगाची मिठाई बनवा. यानंतर ती मिठाई गणेशाला अर्पण करावी. हा उपाय केल्याने मुलाच्या विवाहाचे योग होतात, असं मानलं जातं.  

Read More