Marathi News> भविष्य
Advertisement

Dusara 2022: रावणाने शनिदेवांना ठेवलं होतं पायाखाली! जाणून घ्या या मागची पौराणिक कथा

रावण हा शक्तिशाली आणि बुद्धिमान होता. अफाट शक्तिच्या जोरावर त्याने भल्याभल्यांना आपल्या मुठीत ठेवलं होतं. जर तुम्ही रामायण (Ramayan) ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाची एक व्यक्ती अडवी पडलेली एक व्यक्ती दिसेल. 

Dusara 2022: रावणाने शनिदेवांना ठेवलं होतं पायाखाली! जाणून घ्या या मागची पौराणिक कथा

Ravan And Shani Dev: आज देशभरात दसरा हा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. प्रभू रामचंद्रांनी (Adipurush Ram) या दिवशी रावणाचा (Ravan) अंत केला होता. मात्र असं असलं तरी रावण हा शक्तिशाली आणि बुद्धिमान होता. अफाट शक्तिच्या जोरावर त्याने भल्याभल्यांना आपल्या मुठीत ठेवलं होतं. जर तुम्ही रामायण (Ramayan) ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाची एक व्यक्ती अडवी पडलेली एक व्यक्ती दिसेल. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शनि देव (Shani Dev) आहेत. रावणाने  सिंहासनाजवळ पायाखाली शनिदेवांना उलटं झोपवल्याचं दिसत आहे. पण रावणाने असं का केलं होतं? ते जाणून घेऊयात...

पौराणिक कथेनुसार रावणाकडे अफाट शक्ती आणि विद्या होती. तंत्र-मंत्रांसह रावणाला ज्योतिष ज्ञान होतं. आपल्या शक्तिच्या जोरावर रावणाने नवग्रहांना आपल्या मुठीत ठेवलं होतं. तसेच रावण या ग्रहांना कायम आपल्या पायाखाली ठेवायचा. आपल्या मुलांच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती नियंत्रित करायचा. 

Astrology: ऑक्टोबर महिन्यात ग्रहांची मोठी उलथापालथ, या तारखेला तूळ राशीत सूर्यग्रहण

पौराणिक कथेनुसार, जेव्हा हनुमान (Hanuman) माता सीतेच्या शोधात लंकेला गेले होते. तेव्हा लंका दहनाच्या वेळी शनिदेवांना रावणाच्या तावडीतून मुक्त केले. हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याआधी रावणाने शनिदेवाला कारागृहात ठेवले आणि बाहेर शिवलिंग स्थापित केले. जेणेकरून शनिदेव शिवलिंगावर पाय ठेवण्याच्या भीतीने बाहेर येऊ शकत नाहीत. मात्र हनुमानाने शिवलिंग काढून शनिदेवांना मुक्त केले.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More