Marathi News> भविष्य
Advertisement

Vastu Tips: ही तुळस चुकूनही घरात लावू नका, अन्यथा नुकसान झालंच समजा

Van Tulsi: हिंदू धर्मात तुळशीचं विशेष असं महत्त्व आहे. घरात तुळशीचं रोप लावणं शुभ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार तुळस घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. त्याचबरोबर तुळशीच्या रोपट्याला रोज पाणी आणि दीपक प्रज्वलित केल्याने धनदेवी लक्ष्मी माता प्रसन्न होते. असं असलं तरी एक तुळस अशीही आहे की घरात लावणं अशुभ मानलं जातं. 

Vastu Tips: ही तुळस चुकूनही घरात लावू नका, अन्यथा नुकसान झालंच समजा

Van Tulsi: हिंदू धर्मात तुळशीचं विशेष असं महत्त्व आहे. घरात तुळशीचं रोप लावणं शुभ मानलं जातं. आयुर्वेदातही तुळसीला महत्त्वाचं स्थान आहे. तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. सर्दी, खोकल्यामध्ये तुळशीचं पानं गुणकारी ठरतात. धार्मिक मान्यतेनुसार तुळस घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. त्याचबरोबर तुळशीच्या रोपट्याला रोज पाणी आणि दीपक प्रज्वलित केल्याने धनदेवी लक्ष्मी माता प्रसन्न होते. असं असलं तरी एक तुळस अशीही आहे की घरात लावणं अशुभ मानलं जातं. ही तुळस नकारात्मक उर्जेचं प्रतिक असते. ही तुळस चुकूनही घरी लावू नये. चला जाणून घेऊयात या तुळशीबाबत..

घरी वन तुळस लावू नका

आतापर्यंत तुम्ही कृष्ण आणि राम तुळशीबाबत ऐकलं असेल. या व्यतिरिक्त अजून एक तुळशीचा प्रकार आहे. या तुळशीला वन तुळस असं संबोधलं जातं. हिंदू धर्मानुसार वन तुळस घरात लावणं वर्जित आहे. वन तुळस घरात लावल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. 

वन तुळस न लावण्याचं कारण

घरात वन तुळस लावल्याने कौटुंबिक कहल वाढत जातात. तसेच घरातील व्यक्तींचं एकमेकांसोबत पटत नाही. या व्यतिरिक्त घरात कायम छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात.

बातमी वाचा- Saphala Ekadashi 2022: कामात यश मिळावं यासाठी सफला एकादशीचं खास महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

राहुची स्थिती खराब होते

घरात वन तुळस लावल्याने कुंडलीत उलथापालथ होते. कुंडलीतील राहुची दशा बिघडण्याची शक्यता असते. याचबरोबर मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे घरात वन तुळस लावू नका असा सल्ला दिला जातो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) 

Read More