Marathi News> भविष्य
Advertisement

Horoscope 9 June 2024 : आज 'या' लोकांचा दिवस खर्चिक असणार! मेष ते मीनपर्यंत कसा असेल तुमचा दिवस?

Horoscope 9 June 2024 : सूर्यदेवाची आजचा रविवार सर्व राशींसाठी कसा असेल, जाणून घेऊया ज्योतिषी प्रितिका मोजुमदार यांच्याकडून...

Horoscope 9 June 2024 : आज 'या' लोकांचा दिवस खर्चिक असणार! मेष ते मीनपर्यंत कसा असेल तुमचा दिवस?

Horoscope 9 June 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज 6 योग जुळून आले आहे. रविवार म्हणजे सुट्टीचा वार आणि त्यात मान्सूनचं आगमन अशात. सर्व राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या ज्योतिषी प्रितिका मजुमदार यांच्याकडून

मेष (Aries Zodiac)  

आजचा दिवस तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिकांना मेहनतीचे फळ मिळणार आहे. बेरोजगारांनी थोडे प्रयत्न केल्यास रोजगार उपलब्ध होईल. अचानक झालेल्या खर्चामुळे थोडी अस्वस्थता जाणवणार आहे. पण परिस्थिती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात असणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

आजचा दिवस शांततेत जाणार आहे. डोकेदुखी आणि शरीर दुखण्याशी संबंधित काही समस्या होणार आहे. मानसिकदृष्ट्या मजबूत असाल. तुम्ही जे काही काम करण्याचे ठरवले आहे ते तुम्ही नफा-तोट्याची चिंता न करता पूर्ण करा.  आज आर्थिक फायदा कमी होणार असला तरीही तुम्ही समाधानी असणार आहात. कार्यक्षेत्रात इतर लोकांच्या हस्तक्षेपामुळे काही त्रास आणि वादविवाद होण्याची शक्यता आहे. ग्रुप इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहात. 

मिथुन (Gemini Zodiac)

आज तुमच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याबाबत चिंता राहणार आहे. औषधांवर खर्च वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला लाभ मिळणार आहे. नवीन काम सुरू करण्याचा विचार पुढे ढकलावा. सरकारी कामात पैसा खर्च झाल्याने आर्थिक कारणांमुळे चिंता वाटणार आहे. पण दुपारच्या सुमारास काही पैशांची आवक झाल्यामुळे दैनंदिन कामे सुरळीत होणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

आज कामात अपयश किंवा एखादा महत्त्वाचा करार रद्द झाल्यामुळे स्वभावात चिडचिडेपणा असणार आहे. बोलण्यात कोरडेपणामुळे काम आणि घरातील वातावरण बिघडरणार आहे. दुपारनंतर काही प्रतिष्ठित व्यक्तीचे सहकार्य मिळण्याची शक्यता असून पैसे गमावण्याची जोरदार शक्यता आहे. आरोग्यातही चढ-उतार पाहिला मिळणार आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

आज उदासीन वाटणार आहे. पोटाशी संबंधित तक्रारी आणि इतर शारीरिक समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असणार आहात. तुमच्या इच्छेनुसार काम होणार नाही. कामात दिरंगाईमुळे अडचणी येणार आहेत. सरकारी कामातही थोडे यश मिळणार आहे. तुमच्या सभोवतालच्या परस्परविरोधी वातावरणामुळे मनात वैराग्य निर्माण होणार आहे. अध्यात्माकडे अधिक रस असणार आहे. काही जुन्या प्रकरणाबाबत कुटुंबीयांशी तक्रार होणार आहेत. पैसे मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac)    

आज तुम्ही तुमच्या महान आकांक्षा पूर्ण होण्यात अडथळ्यांमुळे निराश होणार आहात. तरीही तुमच्यात चांगले आणि वाईट यातील विवेक असेल तर तुम्हाला मानसिक त्रास होणार नाही. कार्यक्षेत्रात अधिकारी आणि सहकारी सहकार्य करणार आहे. निर्धारित वेळेपूर्वी कामं पूर्ण करणार आहात. घरगुती कामात व्यस्त राहणार आहात. धार्मिक कार्यातही सक्रियता असणार आहे. आज तुम्ही स्वत:ला कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कामांपासून दूर ठेवा. 

तूळ (Libra Zodiac)  

आज कार्य करण्याआधीच हार स्वीकारली तर यशाची फारशी आशा राहणार नाही. आज तुम्हाला कुणाचे सहकार्य करावे लागेल किंवा इच्छा नसतानाही काही अप्रिय काम करावी लागणार आहेत. कुटुंबातील परस्पर मतभेदांमुळे तुम्हाला समन्वय राखता येणार नाही. एक क्षण आनंद आणि दुसऱ्या क्षणी दुःख असा आजचा दिवस असणार आहे. पैशामुळे तुमचा मूड खराब असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

आज हट्टी राहिल्याने व्यवसायात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. प्रियजनांपासून दुरावा निर्माण होईल. महत्त्वाची कामं अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच करा, अन्यथा काही काळ पुढे ढकला. नोकरदारांच्या वागण्यामुळेही अडचणी येऊ शकतात. दुपारनंतर हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येईल. अचानक आर्थिक लाभापासून दिलासा मिळणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac) 

आज पैशाची कमतरता असली तरी आनंदी राहण्याचा यशस्वी प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांशी भावनिक संबंध ठेवल्याने मनाला शांती मिळणार आहे. पण आज प्रेमप्रकरणांपासून दूर राहणे चांगलं होणार आहे. अन्यथा धन आणि कौटुंबिक सन्मानाची हानी होऊ शकते. एखाद्या शुभ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे तुम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. तरीही आनंददायी वातावरण असल्यास खर्च वाया जाणार नाही. स्त्री पक्षाशी विशेष जवळीकता राहील.

मकर (Capricorn Zodiac)   

आज मन प्रसन्न ठेवल्याने आजूबाजूचे वातावरण विनोदी असणार आहे. मित्र भविष्यातील योजनांवर प्रियजनांसोबत मोकळेपणाने चर्चा करा. पण दुपारनंतर परिस्थिती पूर्णपणे उलटणार आहे. काही इच्छा अपूर्ण राहिल्याने तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यातून सावरण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. आज स्वभावात फार मोकळेपणाने वागू नका. तुमच्या मनातील गुपिते इतरांना सांगितल्याने नुकसान होऊ शकतं. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

आज तुम्हाला प्रत्येक कामात सावध राहण्याचा राहवं लागणार आहे. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे धनासोबत मान-सन्मान हानी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी अप्रिय घटनांमुळे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या आचरणामुळे मन दुखी असणार आहे. मनातील चुकीच्या विचारांचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. तुमचे डोके किंवा शरीराचे इतर अवयव निष्क्रिय झाल्याचे तुम्हाला जाणवणार आहे. 

मीन  (Pisces Zodiac)  

आज तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल असेल तर तुम्हाला लाभाच्या अनेक संधी मिळणार आहे. मात्र अज्ञानामुळे किंवा चुकीच्या सल्ल्याने नफा संशयास्पद असणार आहे. बहुप्रतिक्षित अत्यंत महत्त्वाचे काम पूर्ण होईल. आर्थिक लाभ अधूनमधून होईल. घरात सुखाची साधने वाढणार असून त्यावर जास्त खर्च होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Read More