Marathi News> भविष्य
Advertisement

Vastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? Study Table वर 'या' गोष्टी ठेवल्यास रट्टा मारण्याची गरजच नाही

Vastu Tips : प्रत्येक घरात मुलं असतं, त्यामुळे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो शिक्षणात चांगला असावा असं प्रत्येक पालकाला वाटतं. वास्तूशास्त्रात तुमच्या मुलाचं Study Table कसं असावं याबद्दल सांगितलं आहे. ज्यामुळे तो प्रगतीचे उंच शिखर गाठेल. 

Vastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? Study Table वर 'या' गोष्टी ठेवल्यास रट्टा मारण्याची गरजच नाही

Vastu Tips Study Table in Marathi : मुलांच्या उज्ज्वल भविष्य, यश आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक पालक प्रार्थना करत असतात. त्यासाठी चांगल्या शाळेची निवड करतात. त्यांच्या अभ्यासावर भर देतात. कारण आपल्या मुलांला उत्तम गुण मिळावे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असतं. त्यामुळे पालक मुलांमागे अभ्यास कर असा तगादा लावत असतात. अनेक मुलांना रट्टा मारण्याची सवय असते. तरीदेखील त्यांना चांगले मार्क मिळत नाही. अनेक गोष्टी करुनही मुलांचा अभ्यासात मन लागत नाही. अशावेळी पालकांना चिंता पडते की त्यांचं पुढे कसं होणार. (Children not interested in studies There is no need to worry if these things are kept in Study Table Vastu Tips in marathi)

तुमच्या या चिंतेचं निरसण केलंय ज्योतिषी डॉ. जया मदन हिने. तिने स्टडी टेबल कसं असावं, अभ्यासाला बसण्याची दिशा कुठली असावी शिवाय पुस्तकांचं कपाट नेमकं कुठे असावं याबद्दल वास्तू शास्त्रानुसार नियम सांगितले आहेत. 

स्टडी टेबलवर 'या' गोष्टी ठेवा!

डॉ. जया मदन सांगते की अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी आणि एनर्जी बुस्ट होण्यासाठी स्टडी टेबलवर दोन किंवाय तीन प्रकारचे पेटींग लावावं. छोटे छोटे पेटींगही तुम्ही लावू शकता. यामध्ये धावणारी कार, सूर्यादय, धावणारी घोडे हे चित्र तुम्ही लावू शकता. 

कुठल्याही देवाची मूर्ती कुठल्या स्वरुपात स्टडी टेबलवर असायला हवं. यामुळे तुम्हीला सकारत्मक वाटतं. तुम्ही स्टडी टेबलवर बुद्धीची देवता गणपतीची मूर्ती किंवा चित्र ठेवू शकता. 

सगळ्यात महत्त्वाच म्हणजे पुस्तकांचं कपाट हे कधी स्टडी टेबलच्या वरच्या बाजूला किंवा डोळ्यासमोर नसावे. वास्तूशास्त्रानुसार यामुळे मुलांवर प्रेशर येतं. 

याशिवाय अजून एक खास गोष्ट म्हणजे स्टडी टेबल कायम स्वच्छ आणि नीटनीटक हवं. त्यासोबत स्टडी टेबलवर थोडं कापूर किंवा तुरटी ठेवा. या वस्तूच्या सुंगधामुळे मेंदूला प्रसन्न वाटतं आणि मुलांचं अभ्यासात मन लागतं. 

जया मदन सांगतात की, अभ्यास करताना तुमचा चेहरा हा पूर्व किंवा उत्तर दिशेने असावं. यामुळे मुलांचा अभ्यासातील गुंता सुटण्यास मदत होते आणि त्यांना ज्ञान ग्रहण करण्यास त्रास होत नाही. 

जर तुमच्याकडे अभ्यासाठी वेगळी स्टडीरुम असेल तर वास्तूशास्त्रानुसार या खोलीचा रंग हा हलका पिवळ, हलका गुलाबी किंवा हलका हिरवा असायला हवां. पिवळा रंग हा विद्येचा रंगचा तर हिरवा रंग हा बुद्धीच्या देवतेचा मानला गेला आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Read More