Marathi News> भविष्य
Advertisement

Chandra Grahan 2022: देव दिवाळीला चंद्रग्रहणावेळी राहू- केतूचे वाईट परिणाम टाळण्यासाठी काय कराल?

Chandra Grahan 2022 : धार्मिक मान्यतांनुसार पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये सूर्य आल्यास चंद्रग्रहणाची स्थिती उदभवते. यावेळी राहू आणि केतूचा कोप झाल्यामुळं त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

Chandra Grahan 2022: देव दिवाळीला चंद्रग्रहणावेळी राहू- केतूचे वाईट परिणाम टाळण्यासाठी काय कराल?

Chandra Grahan 2022 : कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला हिंदू पंचांगानुसार देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवसाविषयी अनेक धारणा आहेत. पण, यंदा मात्र (Diwali 2022) दिवाळीप्रमाणेच देवदिवाळीवरसुद्धा ग्रहण आलं आहे. हे वर्षातलं शेवटचं ग्रहण  (Chandra Grahan 2022)असणार आहे.

भारतात (india) सायंकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी हे ग्रहण सुरु होणार असून, ते सायंकाळी 6 वाजून 18 मिनिटांपर्यंत असणार आहे. धार्मिक मान्यतांनुसार पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये सूर्य आल्यास चंद्रग्रहणाची स्थिती उदभवते. यावेळी राहू आणि केतूचा कोप झाल्यामुळं त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

नोव्हेंबर महिन्यातील 8 तारखेला असणारं हे चंद्रग्रहण भारतात प्रभावी स्थितीत असणार आहे. याता सूतक काळही पाळला जाणं महत्त्वाचं असेल. यादरम्यान राहू- केतूचा (Rahu ketu) वाईट प्रभाव टाळण्यासाठी मंत्रोच्चार करवेत. ग्रहण कालात तुळशीपत्राचे (basil leaves) सेवन करावं. असं न केल्यास आयुष्यातील काही क्षणांमध्ये अस्थिरतेचं सावट असेल.

अधिक वाचा : Chandra Grahan 2022 : आता देव दिवाळीवरही ग्रहण; वर्षातल्या दुसऱ्या चंद्रग्रहणाविषयी A to Z माहिती एका क्लिकवर

 हिंदू धर्मातील (Hindu religion) मान्यतांनुसार या ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं असेल. ग्रहणापूर्वी 9 तास आधीच सूतक काळ सुरु होणार आहे. त्यामुळं यादरम्यान कोणतंही आध्यात्मिक काम हाती घेऊ नये. चंद्रग्रहणाचा काळ शुभकार्यांसाठी योग्य नसल्यामुळं तशी आखणीही करु नका. 

दरम्यान ते नोव्हेंबर (November 2022) महिन्यातील ग्रहण हे खग्रास, म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण (Lunar Eclips) असणार आहे. भारतात हे पूर्ण ग्रहण बहुतांश पूर्व भागातून दिसणार आहे. तर काही भागातून ते अंशिक स्वरुपात दिसेल. ग्रहणाच्या या स्थितीमुळे ज्योतिषविद्या अभ्यासकांच्या मते देवदिवाळी एक दिवस आधी साजरा केली जाऊ शकते. 

Read More