Marathi News> भविष्य
Advertisement

September 2022: 24 तासानंतर चंद्र करणार वृश्चिक राशीत प्रवेश, मनावर कसा होईल परिणाम? जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाच्या गोचराला महत्त्व आहे. ग्रहांच्या गोचराचा प्रत्येक राशीवर परिणाम होत असतो.

September 2022: 24 तासानंतर चंद्र करणार वृश्चिक राशीत प्रवेश, मनावर कसा होईल परिणाम? जाणून घ्या

Chandra Gochar In Vrushchik Rashi: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाच्या गोचराला महत्त्व आहे. ग्रहांच्या गोचराचा प्रत्येक राशीवर परिणाम होत असतो. ग्रहांचा गोचर हा ठराविक कालावधींसाठी असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे? याला महत्त्व आहे. सप्टेंबर महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्य ग्रह राशी बदल करणार आहेत. या व्यतिरिक्त बुध ग्रह वक्री होणार असून शुक्र अस्ताला जाणारा आहे. या ग्रहांचे परिणाम काही कालावधीसाठी होणार आहेत. पण मनाचा कारक असलेला चंद्र ग्रह दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करणार आहे त्याचा परिणाम बारा राशींवर होईल. 

2 सप्टेंबर 2022 रोजी चंद्र ग्रह संध्याकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सध्या वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. त्यामुळे कोणतीही युती किंवा योग तयार होत नाही. मात्र भाद्रपद पंचमी असल्याने चंद्र कला वाढती आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या मनाची मोठी घालमेल या काळात पाहायला मिळेल. चंद्र या राशीत 4 सप्टेंबर 2022 पर्यंत असणार आहे.

  • वृश्चिक रास- चंद्र पहिल्या स्थानात
  • तूळ रास- चंद्र दुसऱ्या स्थानात
  • कन्या रास- चंद्र तिसऱ्या स्थानात
  • सिंह रास- चंद्र चौथ्या स्थानात
  • कर्क रास- चंद्र पाचव्या स्थानात
  • मिथुन रास- चंद्र सहाव्या स्थानात
  • वृषभ रास- चंद्र सातव्या स्थानात
  • मेष रास- चंद्र आठव्या स्थानात
  • मीन रास- चंद्र नवव्या स्थानात
  • कुंभ रास- चंद्र  दहाव्या स्थानात
  • मकर रास-चंद्र अकराव्या स्थानात
  • धनु रास- चंद्र बाराव्या स्थानात

गोचर कुंडलीतील प्रथम स्थान यशापश, पूर्वज, सुख दु:ख, आत्मविश्वास, अभिमान आणि डोकं यासाठी गणलं जातं. या स्थानात चंद्र येणार असल्याने मन चंचल असणार आहे. वैदिक ज्योतिषात चंद्राला मनाचा कारक मानला जातो. चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचे मन अशांत किंवा स्थिर होते. मनुष्याचे मनावर नियंत्रण असेल तर सगळं सहज शक्य होतं, पण मन अस्थिर असेल तर काम व्यवस्थित होत नाही. एकूणच कामाच अनेक अडचणी येतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More