Marathi News> भविष्य
Advertisement

Budh Gochar : बुध करणार शनी राशीत प्रवेश, या राशींच्या हातात पैसाच पैसा

Mercury Transit in Capricorn 2023: बुध गोचरमुळे अनेक राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत प्रवेश करत आहे. यामुळे तो अनेकांना चांगले फळ देईल.

Budh Gochar : बुध करणार शनी राशीत प्रवेश, या राशींच्या हातात पैसाच पैसा

Budh Gochar 2023: बुधाचे गोचरमुळे तीन राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. त्यांच्या गोचरमुळे सर्व 12 राशींच्या लोकांवर मोठा प्रभाव पडतो. फेब्रुवारी महिन्यात धन, व्यवसाय, बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक बुध ग्रह संक्रांत आहे. बुध आपली राशी बदलून तो शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध आणि शनी यांच्यात मैत्री होणार असल्याने, बुध काही राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती देईल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभही मिळणार आहेत. 7 फेब्रुवारी 2023 रोजी बुध ग्रहाच्या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घ्या. 

बुध गोचरचा या राशींच्या लोकांना मोठा लाभ होणार

वृषभ : बुध हा शनी राशीत प्रवेश करत असल्याने तसेच मकर राशीतील बुधाचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ राहील. या लोकांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसाय वाढेल. एकादा प्रवास होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. 

धनु : बुध गोचरचा धनु राशीच्या लोकांना चांगला फायदा होणार आहे. बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे धनु राशीच्या लोकांना लाभ होईल. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात वाढ होईल. मोठ्या ऑर्डर मिळतील. नोकरदार लोकांना नवीन ऑफर मिळतील. रखडलेले पैसे हाती येतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील.

मीन: बुध गोचरमुळे मीन राशींच्या लोकांना फायदा होणार आहे.  बुधाचे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देईल. या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल.. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. व्यवसायासाठी हा काळ लाभदायक राहील. नवीन करार निश्चित होऊ शकतात. तसेच गुंतवणुकीसाठीही हा चांगला काळ आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More