Marathi News> भविष्य
Advertisement

Body Language : ऑफिसमधील Colleague चा स्वभाव जाणून घ्यायचा आहे? बॉडी लँग्वेज वाचण्याची 'ही' खास पद्धत

About body language : ऑफिसमध्ये ज्याचा बरोबर आपण कामं करतो त्याचा फक्त बसण्याचा सवयीवरुन तुम्ही त्याचा स्वभाव ओळखू शकता, कसा तो जाणून घ्या. त्यामुळे यापुढे ऑफिसमध्ये बसण्याची तुमची सवय आताच बघून घ्या...

Body Language : ऑफिसमधील Colleague चा स्वभाव जाणून घ्यायचा आहे? बॉडी लँग्वेज वाचण्याची 'ही' खास पद्धत

About body language : आपण प्रत्येकाचा मनात काय सुरु आहे. समोरचा काय विचार करतो, त्याचा स्वभाव कसा आहे. हे प्रत्येक वेळी ओळखू शकतं नाही. ज्योतिषशास्त्रानुसार (astrology) किंवा अंकशास्त्रानुसार (Numerology) राशी आणि जन्मतारखेवरुन आपण साधारण ती व्यक्ती कशी असेल तिचा स्वभाव कसा असेल हे सांगितलं जातं. अगदी महिलांचे केस किंवा आपल्या हाताची करंगळी यावरुनही तुम्हाला समोरच्याचा स्वभाव करु शकतो. पण दुसरी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज (body language) यावरुनीही तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा अंदाज घेता येतो. ऑफिसमध्ये आपण सगळ्यात जास्त वेळ घालवतो. त्याचा बसण्याची सवय त्याच्या उठण्याची सवय यावरुन तुम्ही त्याचा स्वभाव ओळखू शकता. यावरून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांसह इतर लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचाही अंदाज लावता येतो. हे सूक्ष्मता समुद्रशास्त्राच्या (oceanography) देहबोलीचा एक भाग आहेत. (body language importance of body language at workplace colleague in office Sitting style on chair in marathi)

गुडघे एकत्र करुन बसणारी लोक

तुम्ही पाहिलं असेल की काही लोक खुर्चीवर बसताना गुडघे एकत्र ठेवतात, तसंच पायाच्या बोटांमध्ये खूप अंतर ठेवतात. या लोकांबद्दल असं म्हटलं जातं की या लोकांमध्ये जबाबदारीची भावना कमी असते. कठीण काळात हे लोक पहिले पाऊल मागे घेतात. त्याचबरोबर त्यांचे व्यक्तिमत्व दिसायला आकर्षक असते.

पाय वरून थोडेसे उघडे ठेवून...

काही लोक पाय वरून थोडेसे उघडे ठेवून आणि घोट्याला खालून पुढे करून बसतात. अशा लोकांना आरामदायी जीवन हवं असतं. तसंच, अशा काही लोकांना कठोर परिश्रम टाळायचे असतात. अशा लोकांची एकाग्रता देखील लवकर डिस्टर्ब होते. त्यांचं मन स्थिर राहत नाही आणि नेहमी इतर ठिकाणी भटकत असतं. 

पायाच्या वर पाय ठेवून...

काही लोक पाय ओलांडून किंवा पायाच्या वर पाय ठेवून बसतात. समुद्रशास्त्रानुसार असे लोक खूप सर्जनशील असतात. त्यांचा स्वभाव हलका लाजाळू आणि नम्र आहे. त्यांचं जीवन खूप आनंदी असतं. अनेकदा असं दिसून आलं आहे की ते अशी कामं टाळतात, ज्यामुळे त्यांना जगासमोर लाजीरवाण वाटेल. 

पाय गुडघ्यापासून घोट्यापर्यंत सरळ ठेवणे

काही लोक खुर्चीवर बसताना आपले पाय गुडघ्यापासून घोट्यापर्यंत सरळ ठेवणे पसंत करतात आणि त्यांची कंबर नेहमीच सरळ असते. या लोकांना शिस्त आवडते. यासोबतच हे लोक खूप वक्तशीर असतात. अशा लोकांच्या आयुष्यात खूप प्रगती होते. याशिवाय ज्या लोकांना पाय चिकटवायला आवडतात ते त्यांच्या वागण्यात थोडे हट्टी मानले जातात. त्याचबरोबर हे लोक महत्वाकांक्षी देखील असतात. 

Read More