Marathi News> भविष्य
Advertisement

Tulsi Tips: घरात तुळस लावलीये? झाली चूक लवकर सुधारा नाहीतर...

Tulsi Vastu Tips: तुळस.... हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं असणारी एक वनस्पती. हे इवलंसं रोप किती महत्त्वाचं असतं ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Tulsi Tips: घरात तुळस लावलीये? झाली चूक लवकर सुधारा नाहीतर...

Van Tulsi Side Effect: देवाचंच महत्त्वं असणाऱ्या तुळशीच्या रुपापुढे आपण दर दिवशी नतमस्तक होतो. सकाळी घरातील गृहिणी तुळशीला पाणी घालून तिला हळकुंकू करुन मनोभावे पूजा करतात. तिन्ही सांजेला याच तुळशीपुढे दिवाही लावतात. देवाच्या चरणी अर्पण करण्यापासून ते अगदी नैवेद्य दाखवण्यापर्यंत आणि औषधांपासून ते अगदी घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यापर्यंतची कामं ही तुळस करते. म्हणूनच की काय तिला प्रचंड महत्त्वाचं स्थान प्राप्त आहे. या रोपट्यामध्ये देवी लक्ष्मीचा वावर असतो अशीही धारणा आहे. पण, तुळस लावून सर्वकाही होतं असा तुमचा समज असेल तर तो आताच दूर करा. (Benefits of tulsi)

शास्त्र काय सांगतं?  
शास्त्रांमध्ये दिलेल्या माहितीनुसार तुळशीपुढे दर दिवशी पूजा करण्यामुळं आणि तिच्यापुढे तुपाचा दिवा लावल्यामुळं देवी लक्ष्मी आपल्या कुटुंबावर प्रसन्न होते. पण, कोणतीही तुळस घरात किंवा अंगणात लावून तिचे फायदे होतात असं नाही. असं म्हणतात की जंगली तुळस (Forest Tulsi) कधीच घरात किंवा अंगणात लावू नये. यामुळं नकारात्मक शक्तींचा वावर वाढतो. 

जंगली तुळस आणि नकारात्मक उर्जा... काय आहे नेमका अर्थ?

(Ram Tulsi/ Krishna Tulsi) राम तुळस आणि कृष्ण तुळस या दोन्ही प्रकारच्या तुळशी घरात लावता येतात. पण, याच तुळशीचा एक असाही प्रकार आहे जो घरात लावता येत नाही. ती तुळस घरात आणल्यास भांडण, तंटे वाढीस लागतात. 

घरातील सुख लयास जातं... 

ज्योतिषविद्येध्ये दिलेल्या माहितीनुसार जंगली तुळस घरात लावल्यास सततचे क्लेश वाढतात. कुटुंबात कधीएकेकाळी एकमत होणाऱ्यांमध्येही मोठे वाद होऊ लागतात. घरातून सुख- शांती आणि समृद्धी लयास जाते. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कामात यश मिळत नाही. घरातील मंडळींची प्रगती खुंटते आणि वातारणातील नकारात्मकता वाढत जाते. 

हेसुद्धा वाचा : तुमच्या पत्नीमध्ये आहेत 'हे' गुण, तर तुम्ही आहात भाग्यशाली

राहु दोषाचंही संकट... 

जंगली तुळस लावल्यास घरात वास्तू दोष उदभवतो. सोबतच पत्रिकेमध्ये असणारी ग्रहांची दशाही बदलू लागते. कुटुंबातील तरुण पिढीच्या भविष्यातील कारकिर्दीमध्ये यामुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळं तुम्ही घरात नेमकी कोणती तुळस लावताय याकडे लक्ष असूद्या. 

(वरील माहिती सर्वसामान्य धारणांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही )

Read More