Marathi News> भविष्य
Advertisement

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date, Time, Schedule, Shubh Muhurat : ज्या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत होतो तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आजची सकाळी जय श्री रामाच्या स्मरणाने झाली. आज नवीन मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. 

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Ayodhya Ram Mandir Ramlala Pran Pratishtha Ceremony Full Schedule : संपूर्ण देश ज्या क्षणाची ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो आज आला आहे. अवघ्या काही तासांमध्ये अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. जगभरातून असंख्य लोक अयोध्येत हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दाखल झाले आहे. रामलल्लाची मंदिरातील गर्भगृहात प्राण प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. आजचा दिवस प्राण प्रतिष्ठापणेसाठी का निवडला आणि शुभ मुहूर्तातील 48 सेकंद का खास आहे ते जाणून घेणार आहोत. (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date Time Schedule Shubh Muhurat  48 Seconds of Ram Lalla Pran Pratishtha Most Special Know the Auspicious Muhurat)

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा शुभ मुहूर्त 

22 जानेवारी 2024 ला राम मंदिरात रामलल्लाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंदचा आहे. याचा अर्थ श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी 84 सेकंद अतिशय महत्त्वाचे आहेत. या शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे.

22 जानेवारी विशेष का आहे?

22 जानेवारीला पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीसह मृगाशिरा, अर्द्रा नक्षत्रासह इंद्र योग आहे. तसंच दिवसभर अमृतसिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योग आहे. यासह अभिजित मुहूर्तासह नवमशा लग्नापासून नवव्या घरात उदात्त गुरु महाराजांच्या सान्निध्यातून शुभकार्य प्राप्त होतात असं म्हणतता. यासोबतच षष्ठियांश 12:30 मिनिटं 21 सेकंदांनी सिंह राशीत जाणार आहे. अशा स्थितीत हा आयुष्याला पवित्र करणारा अत्यंत शुभ योग मानला गेला आहे. 

प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय?

हिंदू धर्मात प्राणप्रतिष्ठेला विशेष महत्त्व असून कोणत्याही देवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने त्यांचं जीनव सफल होतं असं म्हणतात. प्राणप्रतिष्ठा म्हणजे प्राणशक्ती प्रस्थापित करणे, असं धर्म शास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे मूर्तीचे अभिषेक झाल्यावर मूर्तीचे देवतेत रूपांतर होतं अशी मान्यता आहे. तर कोणत्याही मूर्तीच्या अभिषेकाचे वेगवेगळे टप्पे असून ज्यामध्ये निवासस्थान, पाणी निवास, अन्न निवास, फळ निवास, कोरडे निवास यासारख्या अधिवासांचा समावेश असतो. 

घरी कशी करावी श्री रामाची पूजा ?

तुमच्या घरी रामलल्लाची मूर्ती नसेल तर 22 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर नवीन मूर्ती घरी आणू शकता. तुम्ही फोटो देखील आणू शकता. त्यानंतर अभिजीत मुहूर्तावर तुमच्या घरातील मंदिरात रामलल्लाचा अभिषेक करुन विधीवत पूजा अर्चा करा.

आज आंघोळ करुन पिवळे, भगवे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करा. आता पूजास्थान स्वच्छ करुन गंगाजल शिंपडून शुद्ध करावे. पूजास्थळ उत्तर आणि पूर्व दिशेचा मध्यभाग म्हणजे घरातील ईशान्य कोपर्‍यात असणं शुभ मानले गेले आहे. ईशान्य भाग शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम असतं. पूजास्थळावरील जुनं सामान, शिळी फुलं, फुलमाळा काढा. आता देव्हार्‍यातील सर्व देव आणि प्रतिमा पुसून स्वस्छ करा आणि त्यांना वस्त्र घाला. आता पाटावर किंवा चौरंगावर लाल कापड घाला. त्यावर श्रीरामाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. प्रतिमा किंवा मूर्ती ही पूर्वाभिमुख ठेवावी. 

पूजा करण्यापूर्वी हातात जल घेऊन पूजेचा संकल्प सोडावा. मूर्तीला जलाभिषेक करुन पंचामृताने न्हाऊ घाला. रोळी अखंड फुले अर्पण करा. तुपाचा दिवा लावावा. धूपबत्ती, अगरबत्ती चेतवावी. कुंकू, अक्षता, चंदन, फुल, फळं, मिठाई, पंचामृत, खीर रामाला अर्पण करावी. शेवटी कापूर पेटवावा आणि आरती करावी. हे लक्षात ठेवा की भगवान श्रीराम सोबतच हनुमानजींचीही पूजा करा. यानंतर हनुमान चालीसा, रामचरितमानस किंवा किमान सुंदरकांड पाठ नक्की करा. शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करा. या खास दिवशी कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरू द्या. यासोबतच संध्याकाळी संपूर्ण घरात दिवे लावून दिवाळी साजरी करावी. या दिवशी संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा नक्की लावा. हे भगवान श्रीरामाच्या आगमनाचं प्रतीक मानलं गेलं आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More