Marathi News> भविष्य
Advertisement

Panchagrahi Yoga : लवकरच सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग'! 'या' राशी होणार मालामाल?

Panchagrahi Yoga : ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रहांचं गोचर होणार आहे. त्यात सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग' हा विशेष योग तयार होत आहे. या योगामुळे तीन राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. 

Panchagrahi Yoga : लवकरच सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग'! 'या' राशी होणार मालामाल?

Panchagrahi Yoga : वैदिक पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात ग्रह आपली राशी बदलतो. अशात कुंडलीत काही योग तयार होतात. काही योग हे अतिशय शुभ असतात तर काही योग संकट घेऊन येतात. ग्रहांचा राजा सूर्यदेव लवकरच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे वाशी राजयोग (vashi rajyog) तयार होत आहे. त्याशिवाय सिंह राशीत सूर्य गोचरमुळे शुक्र, मंगळ, बुध, रवि आणि चंद्र यांचा संयोग होणार आहे. यातून 'पंचग्रही योग' तयार होत असून जवळपास 12 वर्षांनी हा योग जुळून आला आहे.  (after 12 years formed panchagrahi yog in leo venus mercury mars sun moon these zodiac signs will get income promotion  )

कधी तयार होणार 'पंचग्रही योग'? 

येत्या 16 ऑगस्टला चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत संध्याकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी गोचर करणार आहे. तर 17 ऑगस्टला सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत बुध, शुक्र आणि मंगळ विराजमान असतानाच चंद्र, सूर्य यांच्या गोचरमुळे पंचग्रही योग तयार होत आहे. त्याशिवाय चंद्र आणि मंगळ यांच्या भेटीमुळे लक्ष्मी योगही निर्माण होतो आहे.

'या' राशींच्या लोकांना होणार लाभ 

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांना पंचग्रही योगाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांच्या कुंडलीतील नवव्या घरात हा योग तयार होत आहे. त्यामुळे या लोकांना नशिबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. नवीन ओळखी भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायिकांसाठी हा उत्तम काळ असणार आहे. लव्ह लाइफमध्येही सकारात्मक परिणाम दिसणार आहे. घरात शुभ कार्य ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. 


वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग अतिशय शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांना या काळात भौतिक सुखाचा आनंद मिळणार आहे. गाडी, मालमत्ता खरेदीचे योग आहेत. वडिलोपार्जित जमिनीतून तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. कोर्टकचेरीत अडकलेली प्रकरण या योग काळात मार्गी लागणार आहेत. 

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या कुंडलीतील तिसऱ्या घरात पंचग्रही योग निर्माण होतो आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. परदेशात व्यापार करणाऱ्यांना या योगामुळे फायदा होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. नातेसंबंधातील वाद मिटणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More