Marathi News> भविष्य
Advertisement

मकर राशीच्या व्यक्तींना २०१९ या वर्षात मिळणार काहीतरी खास

मकर राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल नवीन वर्ष ?

मकर राशीच्या व्यक्तींना २०१९ या वर्षात मिळणार काहीतरी खास

मुंबई : 2019 हे नवीन वर्ष मकर राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मकर राशीच्या व्यक्तींसाठी 2019 हे नवीन वर्ष काही तरी खास घेऊन येणार आहे. करिअर, कौटुंबिक जीवन, आर्थिक स्थिती आणि आरोग्य याबाबतीत 2019 हे वर्ष किती लाभदायक असेल जाणून घ्या.

राशी फळ : नवीन वर्षात श्रेष्ठ विचारांमुळे कर्तव्य पार पाडाल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. संपत्तीबाबत काही विवाद होऊ शकतो. सप्टेंबर हा महिनी कुंभ राशीसाठी शुभ ठरेल. मेहनतीचं फळ मिळेल.

करिअर : बिझनेसमध्ये मोठी गुंतवणूक होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी बेजबाबदारपणे वागू नये. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. विचार करुन गुंतवणूक करा. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो.

कौटुंबिक जीवन : वैवाहिक जीवन आणि प्रेम-संबंधांसाठी चांगली वेळ आहे. विवाहसाठी पार्टनर शोध पूर्ण होऊ शकतो. हे वर्ष तुम्ही ऐन्जॉय कराल. परिवारासोबत वेळ घालवता येईल.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. पैशांचा व्यवहार विचार करुन करा. पगारवाढीच्या बाबतीत निराशा होऊ शकते.

आरोग्य : कोणतीही जुनी समस्या पुन्हा उद्भवू शकते. इन्फेक्शनपासून लांब राहा. वर्षाच्या सुरुवातीला थोडा तणाव राहू शकतो. गाडी चालवताना सावध राहा. 

एकंदरीत हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी मात्र मेहनत करावी लागेल. आई-वडील आणि पत्नीचा सहयोग मिळेल. पैशांच्या बाबतीत विचार करुन निर्णय घ्या. समज वाढवा. संपत्तीच्या वादाला व्यवस्थित तोंड द्या. नातेवाईकांसोबत व्यवहार करताना सावध राहा.

Read More