Marathi News> रिलेशनशीप
Advertisement

Health benefits of sex : दीर्घकाळ SEX न करण्याचे आरोग्यावर भयानक परिणाम; कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचाही धोका

दीर्घकाळ SEX न केल्याने आरोग्यावर भयानक परिणाम होतात. तसेच अनेक गंभीर आजारांचाही धोका देखील निर्माण होऊ शकतो. एका नविन संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.      

Health benefits of sex : दीर्घकाळ SEX न करण्याचे आरोग्यावर भयानक परिणाम; कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचाही धोका

Health benefits of sex : एखाद्या जोडप्याचे नाते अधिक घट्ट आणि विश्वसनीय बनवण्यासाठी शरीर संबध  अर्थात लैंगिक संबध महत्वाची भूमिका बजावतात. नियमीत सेक्स करण्याचे अनेक मानसिक आणि शारिरीक फायदे आहेत. सेक्स केल्याने मूड रिफ्रेश होतो. यामुळे मानसिक तणाव कमी होतो. तसेच SEX करताना होणऱ्या विविध प्रकारच्या हालचालींमुळे शारीररीक स्वास्थही सुधारते. मात्र, दीर्घकाळ SEX न केल्याने आरोग्यावर भयानक परिणाम होतात. तसेच अनेक गंभीर आजारांचाही धोका देखील निर्माण होऊ शकतो. एका नविन संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.      

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन अर्थात NCBI ने नुकतेच एक संशोधन केले. यात सेक्स दीर्घ काळापर्यंत सेक्स न करण्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात याबाबत अभ्यास करण्यात आला.  NCBI ने केलेल्या सर्वेक्षणात 17744 लोकांनी भाग घेतला. त्यापैकी 15.2% पुरुष आणि 26.7% महिलांनी 1 वर्षापासून सेक्स केला नव्हता. तर,  8.7% पुरुष आणि 17.5% महिलांनी 5 वर्षे लैंगिक संबध ठेवले नाहीत. त्यांच्या शरीरात अनेक परिणाम दिसून आले. जास्त वेळ सेक्स न केल्याने त्यांना अनेक आरोग्य विषय समस्यांना सामोरे जावे लागल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. 

डिप्रेशन

नियमीत सेक्स केल्याने मानसिक स्वास्थ उत्तम राहते. सेक्स करताना शरीरात तयार होणाऱ्या हार्मोन्समुळे तणाव कमी होतो. मात्र, दीर्घकाळ सेक्स न करण्यांमध्ये मानसिक तणाव वाढल्याचे समोर आले आहे. 

स्मरणशक्ती कमी होणे

जे लोक लैंगिक संबंध ठेवतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते अस संशोधनातून समोर आले आहे. मात्र, सेक्स न केल्याने स्मरणशक्ती कमी होते.  सेक्स केल्याने मेंदूला न्यूरॉन्स वाढण्यास आणि चांगले काम करण्यास मदत करू शकते. 

रक्तदाब वाढतो 

सेक्स न केल्याने  रक्तदाब देखील वाढू शकतो. मानसिक ताण वाढल्याचा रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि रक्तदाबही अनियमित होतो.

प्रोस्टेट कर्करोगाचा धोका

सेक्स न केल्याने पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाचा धोका असतो. मात्र, सरासरी महिन्यात 21 वेळा सेक्स करणाऱ्या जोडप्यांना याचा धोका नसतो असेही या संशोधनातून समोर आले आहे. सेक्स केल्याने रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. मात्र, जे नियमीत सेक्स करत नाहीत त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. 

 

Read More