Marathi News> रिलेशनशीप
Advertisement

सुखी संसाराची स्वप्न तिने उराशी बाळगली, पण लग्नाच्या पहिल्याच रात्री...

हनीमूनला गेल्यानंतर मुलीच्या पायाखालची जमिनीच सरकली. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला

सुखी संसाराची स्वप्न तिने उराशी बाळगली, पण लग्नाच्या पहिल्याच रात्री...

प्रत्येक मुलीला वाटतं की, लग्नानंतर आपल्या सासरी सूख असावं, समाधान असावं. होणारा पती काळजी करणारा असावा. भरपूर प्रेम करणारा असावा. असं स्वप्न अनेक मुलींचे असतं. तसं तिचं सुद्धा होतं. लग्न ठरल्यापासून ती सुखी संसाराची स्वप्न पाहात होती. मुंबईत लहानाची मोठी झालेली ती लग्नानंतर मध्यप्रदेशच्या इंदौर येथे राहण्यास गेली. लग्नानंतर नवविवाहित जोडपं हनीमूनला गेलं. हनीमूनला गेल्यानंतर मुलीच्या पायाखालची जमिनीच सरकली. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. एका क्षणात सगळी स्वप्न धुळीस मिळाली. घटना मध्यप्रदेशाच्या इंदौरची आहे. 

पत्नीचा भ्रमनिरास! 

हनीमूला गेलेले दोघे जण जेव्हा परतले तेव्हा; 'ती' सोबत आनंद नाही तर दु:खी मन घेवून आली. आपला पती नपुंसक असल्याचं तिचं म्हणणं होतं. पतीला अनेक अजार आहेत तो नपुंसक आहे हे तिने सासरच्या मंडळींना सांगितलं. सुनेचं म्हणणं ऐकल्यानंतर सासूसह सासरा आणि इतर रागाने लालबूंद झाले. सुनेला मारहाण करु लागले. तिच्याकडे हुंड्याची मागणी करु लागले. सुनेला घराच्या बाहेर काढलं. 

पोलिसांत तक्रार 

नवविवाहित तरुणीने थेट गाठलं पोलिस स्टेशन. पोलिसांना घडला प्रकार सांगितला. पोलिसांकडून पती, सासरा, सासू आणि ननंद यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. पीडितेचं म्हणणं होतं की, 'लग्न फेब्रुवारी 2022 मध्ये झालं होतं. लग्नात इतर सामानासह 5 लाख रुपये हुंडा म्हणून दिला होता. लग्नानंतर पहिल्या आठ दिवसांत पतीसोबत कोणतेही शारीरिक संबंध जुळले नव्हते. जेव्हा हनीमूनला गेलो तेव्हा पती नपुंसक असल्याचं कळालं' घडला प्रकार सासरी सांगितल्यानंतर  सासरच्या मंडळींनी 10 लाख रुपये हुंडा देण्याची मागणी केली

Read More