Marathi News> रिलेशनशीप
Advertisement

नवरा-बायकोने कधीही एका ताटात जेवण करु नये! भीष्म पितामह यांनी सांगितलं 'या' मागील रहस्य

नवरा-बायकोने एका ताटात खाऊ नये, असे धर्मग्रंथांचे वडील आणि अभ्यासक सांगतात.

नवरा-बायकोने कधीही एका ताटात जेवण करु नये! भीष्म पितामह यांनी सांगितलं 'या' मागील रहस्य

मुंबई : लग्न झाल्यानंतर नवरा-बायकोंचा काही काळ एकमेकांना समजण्यात जातो. या काळात सगळ्याच गोष्टी दोघांसाठीही नवीन असतात. अशातच बऱ्याचदा नवरा-बायको एकमेकांप्रती प्रेम दाखवण्यासाठी एकाच ताटत जेवतात. असे म्हटले जाते की, नवरा-बायकोने एकाच ताटात खाल्याने त्यांच्यातील प्रेम वाढते. त्यामुळे काही नवरा-बायको ठरवून एकाच ताटात जेवतात आणि एकमेकांचं उष्ट खातात. परंतु तुम्हाला माहितीय का नवरा-बायकोंना असं न करण्याचा सल्ला महाभारतात दिला गेला आहे. असं केल्याने कुटूंबात कलहं होतात असं देखील तेथे म्हटलं गेलं आहे.

नवरा-बायकोने एका ताटात खाऊ नये, असे धर्मग्रंथांचे वडील आणि अभ्यासक सांगतात. पण, असं का म्हटलं जातं, अनेकदा लोकांना याबद्दल माहिती नसते. चला जाणून घेऊ या यामागील कारण

एकत्र जेवण केल्याने प्रेम वाढते हे नाकारता येणार नाही आणि भीष्म पितामह यांनाही हे चांगलेच माहित होतो. प्रत्येक माणसाची कुटुंबाप्रती अनेक कर्तव्ये आहेत, असा त्यांचा विश्वास होता. अशा परिस्थितीत जर ती कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडायची असतील आणि कुटुंबात सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे असतील, तर पती-पत्नीने ताटात जेवण करू नये.

खरे तर पत्नीसोबत ताटात जेवण केल्याने कुटुंबातील इतर नातेसंबंधांच्या तुलनेत पत्नीचे प्रेम नवऱ्यासाठी सर्वतोपरि होतं. अशा स्थितीत व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरतो.

जर पतीचे पत्नीवरील प्रेम सर्वतोपरि झालं तर कुटुंबात कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पत्नीसोबत ताटात जेवण करू नये.

कुटुंबाने एकत्र बसून जेवायला हवं

कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करावे, अशी भीष्म पितामहांची धारणा होती. यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते. यासोबतच एकमेकांप्रती त्याग आणि समर्पणाची भावनाही प्रबळ असते. यामुळे कुटुंबाची प्रगती देखील होते.

असे अन्न खाऊ नये

भीष्म पितामहांचा असा विश्वास होता की, जर कोणी जेवणाचे ताट ओलांडले तर ते जेवण दूषित होते. ते जनावरांना खायला द्यावे. याशिवाय जर कोणी अन्नाच्या ताटावर पाय मारला तर अन्नाला हात जोडून ते अन्न टाकून देणे. कारण असे अन्न खाल्याने घरात गरीबी येते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)

Read More