Marathi News> पुणे
Advertisement

Extramarital Affair: अनैतिक प्रेमसंबधाचा भयानक अंत, प्रियकराने प्रियसीच्या लहान लेकराला उकळत्या पाण्यात बुडवलं

Pune Crime News : आरोपीने अनैतिक संबंधातून फिर्यादीच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात, दोन्ही पाय एकत्र धरून बाथरूममधील उकळत्या गरम पाण्याच्या बकेटमध्ये खाली वर करून पाण्यामध्ये बुडवले. 

Extramarital Affair: अनैतिक प्रेमसंबधाचा भयानक अंत, प्रियकराने प्रियसीच्या लहान लेकराला उकळत्या पाण्यात बुडवलं

Pune Crime News : आईच्या कर्माची शिक्षा तिच्या लहान लेकराला भोगावी लागली आहे. अनैतिक संबंधातून (Extramarital Affair) प्रियकराने प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात बुडविल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा  मृत्यू झाला आहे याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Pune Crime News). 

विक्रम शरद कोळेकर असे गुन्हा दाखल झालेल्याचे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मृत मुलाच्या आईने अर्थात आरोपीच्या प्रेयसीनेच चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

विक्रम शरद कोळेकर असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी विक्रम शरद कोळेकरचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. आरोपीने अनैतिक संबंधातून फिर्यादीच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात, दोन्ही पाय एकत्र धरून बाथरूममधील उकळत्या गरम पाण्याच्या बकेटमध्ये खाली वर करून पाण्यामध्ये बुडवले. मुलाची पाठ, डोके, चेहरा, पोट, पायाच्या मांड्या पुर्णपणे भाजून कातडी जळुन लालसर झाली.  या घटनेत गंभीर जखमी झालेल्या या चिमुरड्याला  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, औषधोपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, या आरोपीने फिर्यादीच्या माननेल्या बहिणीला देखील जीवे ठार मारण्याची धमकी दिला. आरोपीने  तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास चाकण पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

अनैतिक संबंधातून महिलेची हत्या 

अनैतिक संबंधातून महिलेची हत्या  करण्याता आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या खडकी बाजार परिसरात एका महिलेचा निर्घृणपणे हत्या करण्यात आली.  46 वर्षीय महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. खडकी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

लिव्ह इन रिलेशनशीप एकासोबत अणि प्रेमसंबध दुसऱ्याच सोबत

एका व्यक्तीसह लिव्ह इन रिलेशनशीप असलेल्या महिलेचे दुसऱ्याच व्यक्तीशी प्रेमसंबध जुळले. यातून या महिलेने नविन प्रियकराच्या मदतीने आपल्या लिव्ह इन पार्टनची हत्या केली. डोंबिवलीत ही धक्कादायक घटना घडली आहे.  महिलेच्या प्रियकराने   तिच्या  लिव्ह इन पार्टनच्या डोक्यात बॅटने वार केले. यात रक्तबंबाळ होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.  या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. 

Read More