Marathi News> पुणे
Advertisement

Pune Crime! परिचारीकेचे अंघोळ करताना चित्रिकरण; आयबी गेस्ट हाऊसमधील प्रकार

सुरक्षा बलाच्या गार्डला अटक

Pune Crime! परिचारीकेचे अंघोळ करताना चित्रिकरण; आयबी गेस्ट हाऊसमधील प्रकार

पुणे : पुणे शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. आयबी गेस्ट हाऊसमध्ये महिला परिचारीकेचे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये महिला परिचारीकेचे अंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे.  सर्वात गंभीर प्रकार म्हणजे आयबी गेस्ट हाऊसमधील सुरक्षा रक्षकानेच हे कृत्य केल्याची बाब उघडकीस आली आहे.

याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. अशोक तुकाराम चव्हाण (वय 26, रा. आयबी गेस्ट हाऊस) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

36 वर्षीय परिचारिका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

कोरोना ड्यूटी करून आल्यानंतर परिचारिका आंघोळ करण्यासाठी गेल्या.

ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्या बाथरूमच्या खिडकीजवळ येत त्यांचे आंघोळ करतानाचे फोटो काढले.

पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. पोलिसांनी त्यांच्या जवळच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता सुरक्षारक्षक आढळून आला.

Read More