PHOTOS

दररोज न चुकता करा ही 5 योगासने, कॉम्प्युटरपेक्षा फास्ट धावेल डोकं!

क आणि शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी योगाचा सराव फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या नियमि...

Advertisement
1/7
मानसिक आरोग्य
 मानसिक आरोग्य

दररोजच्या तणावाखाली राहिल्यामुळे आपण अनेकदा अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांना बळी पडतो. दररोज न चुकता करा ही योगासने केल्याने तुम्हाला अगेच फरक दिसून येईल. 

2/7
पद्मासन
पद्मासन

पद्मासन हे उत्तम मानसिक आरोग्यासाठी उत्तम योगासनांपैकी एक आहे. आपली पाठ सरळ ठेवून जमिनीवर आरामदायी चटईवर बसा. आता तुमचा उजवा पाय डाव्या मांडीवर आणि डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा. पद्मासन योगाभ्यासामुळे तुमचं मन आणि शरीर दोन्हींना आराम मिळेल.

3/7
पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन

दिवसभर खुर्चीवर बसून काम करणाऱ्या लोकांनी हे योगासन नक्की करावं. जमिनीवर आरामात आणि सरळ बसा. आता तुमचे दोन्ही पाय पुढे पसरवा. आता पाय सरळ ठेवून, दोन्ही हातांनी बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. 

4/7
कपालभाती
कपालभाती

कपालभातीचा नियमित सराव केल्याने मेंदू अधिक सक्षम होतो. जमिनीवर चटई टाकून तुम्ही सुखासनाच्या स्थितीत बसा, त्यानंतर दीर्घ श्वास घ्या, हळूहळू श्वास सोडा आणि पोट आतल्या बाजूला खेचा. 

5/7
अनुलोम-विलोम
अनुलोम-विलोम

आपल्या मेंदूतील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी अनुलोम-विलोम उपयोगी ठरतो. जमिनीवर चटई पसरून पद्मासनाच्या स्थितीत बसा. नाकपुड्या बंद चालू करत तुम्हाला दीर्घ श्वास घ्याचा आणि सोडायचा आहे. ही क्रिया तुम्ही 5 मिनिटे करू शकता.

6/7
ताडासन
ताडासन

डोकेदुखी आणि निद्रानाश यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवायचा असेल तर ताडासनची योगक्रिया करणं गरजेचं आहे. जमिनीवर सरळ उभे राहा, तुमच्या पायांमध्ये सुमारे 1 फूट अंतर ठेवा. आता हातांची बोटे एकमेकांना जोडून श्वास घ्या आणि हात वर खेचा. 3 ते 4 मिनिट तुम्ही ही क्रिया करू शकता.

7/7
शिर्षासन
शिर्षासन

शिर्षासन हे आसन केल्याने मेंदूकडे रक्ताचा प्रवाह वाढतो. त्यामुळे आपली स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. मात्र, प्रत्येतजण शिर्षासन करु शकत नाही.