PHOTOS

Team India ला अमेरिकेतून WWE Superstar चा पाठिंबा! भारतीय जर्सीत पोस्ट केला फोटो

agram Post Ahead Of World Cup 2023: भारतामध्ये खेळवल्या जात असलेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे...

Advertisement
1/8

एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेची जगभरामध्ये चर्चा आहे. भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेची अमेरिकेतही चर्चा असल्याचे संकेत मिळत आहेत.

2/8

एकीकडे कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. अशातच आता भारतीय संघाच्या समर्थनार्थ एक डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टारही उतरला आहे.

3/8

वर्ल्ड वाइड रसलिंग म्हणजेच WWE च्या भारतीय सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारतीय संघाला उघडपणे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

4/8

या अकाऊंटवरुन चक्क एका प्रसिद्ध WWE सुपर स्टारचा भारतीय संघाच्या जर्सीमधील फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

5/8

या फोटोमध्ये दिसणाऱ्या डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टारचं नाव ड्र्यू मॅकइन्टायर (Drew McIntyre) असं आहे.

6/8

फोटोच्या कॅप्शनमध्ये, "ड्र्यू ब्लीड्स ब्ल्यू" असं म्हणत भारतीय तिरंग्याच्या इमोजीही वापरण्यात आला आहे.

 

7/8

डब्ल्यूडब्ल्यूईच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेला हा फोटो एडीटेड आहे. 

8/8

काही काळापूर्वी भारतात झालेल्या डब्ल्यूडब्ल्यूईच्या कार्यक्रमामध्ये ड्र्यू मॅकइन्टायर भारतीय चाहत्यांनी अगदी जल्लोषात स्वागत केलं होतं. त्यामुळेच डब्ल्यूडब्ल्यूईच्या अकाऊंटवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 





Read More