PHOTOS

Lung Cancer Symptoms: सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, फुप्फुसाचा कॅन्सर ठरतोय जीवघेणा, पाहा लक्षणे

2024: आज 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने जाणून घेऊयात फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची क...

Advertisement
1/9

देशात सध्या कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक असून ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकलकॅन्सरचं प्रमाण वाढत जात असलं तरी फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाणही तितकंच आहे. 

 

2/9

बरेचदा श्वसनाचा आजार होतो पण वाढत्या प्रदुषणामुळे होत असेल म्हणून दुर्लक्ष केलं जातं. आज 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने जाणून घेऊयात फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची कारणं. 

3/9

सिगरेट आरोग्यास हानिकारक आहे असं वारंवार सांगून देखील खूप जणांना धुम्रपानाची सवय सोडवत नाही. स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर  होतो हे  WHO च्या अहावालातून सिद्ध झालं.  जागतिक आरोग्य संघटनेच्या अहावालानुसार भारतात फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. 

 

4/9
फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं
 फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं

फुफ्फुसाचा कॅन्सर होणाऱ्या रुग्णाला सतत ताप येतो. त्यामुळे अंगात कणकण जाणवत असेल तर अंगावर काढू नका असं डॉक्टर सांगतात.

5/9

रुग्णांना सतत खोकला येणं. दिवसेंदिवस हा खोकला वाढत जाऊन रक्त पडतं. ही लक्षणं रुग्णांमध्ये दिसून येतात. 

6/9

श्वास घ्यायला त्रास होणं, भूक न लागणं आणि सतत थकवा जाणवणं ही फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं आहेत. 

 

7/9

सतत घाबरल्यासारखं वाटणं किंवा घश्याखाली जेवण न जाणं हा त्रास सतत जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

 

8/9

वाढत जाणारं प्रदुषण धुम्रपान हे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. 

 

9/9
फुफ्फुसाच्या कॅन्सर होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी ?
फुफ्फुसाच्या कॅन्सर होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी ?

धुम्रपानामुळे सर्वात जास्त त्रास हा फुफ्फुसांना होतो. त्यामुळे स्मोकिंग करणं टाळावं असं डॉक्टर वारंवार सांगतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

 





Read More