PHOTOS

शिखर धवन निवृत्तीनंतर IPL 2025 खेळणार का? व्हिडीओमध्ये दिले सुचक संकेत

ीम इंडियाचा गब्बर अशी ओळख असलेला शिखर धवनने शनिवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. तो बराच काळ भारतीय संघाबाहेर होता....

Advertisement
1/5
गब्बर नेव्हर बॅक
गब्बर नेव्हर बॅक

शिखरने टीम इंडियासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आणि अनुक्रमे 2315, 6793 आणि 1759 धावा केल्या. तर अनेक आयसीसी सामन्यात तो मॅन ऑफ मॅच देखील राहिलाय.

2/5
पुनरागमन नाहीच
पुनरागमन नाहीच

धवनने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला. त्यानंतर शिखरला पुनरागमनाची संधी मिळाली नाही. मात्र, आयपीएलच्या माध्यमातून तो मिश्या पिळत राहिला.

3/5
क्रिकेटमधून निवृत्ती
क्रिकेटमधून निवृत्ती

आता शिखरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर तो आता डॉमेस्टिक म्हणजेच देशांतर्गत क्रिकेट देखील खेळणार नाही, असं त्याने निवृत्तीच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

4/5
पंजाब किंग्ज
पंजाब किंग्ज

पण शिखर धवनने आयपीएलमधून अजूनही निवृत्ती घेतल्याचं व्हिडीओमध्ये म्हटलं नाहीये. त्यामुळे गब्बर आयपीएलमध्ये गर्जना करू शकतो, अशीच शक्यता आहे. पण पंजाब किंग्जच्या निर्णयावर सर्वकाही अवलंबून असेल.

5/5
ऑक्शन
ऑक्शन

यंदाच्या ऑक्शनमध्ये पंजाब किंग्ज शिखर धवनला कायम ठेवणार का? असा देखील सवाल विचारला जातोय. जर शिखर धवनला लिलावामध्ये उतरवलं तर शिखरची बॅट कोणत्या संघाकडून कडाडणार? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.





Read More