PHOTOS

लग्नात डोक्यावर अक्षता का टाकतात? शास्त्रात तांदळाला एवढं महत्व का?

In Hindu Wedding Ceremony In Marathi: लग्नात बऱ्याच विधी अस्तात लग्नकार्य निटपार पडावं म्हणून या विधी केल्या जातात. लग्नातील प...

Advertisement
1/7

लग्नात बऱ्याच विधी अस्तात लग्नकार्य निटपार पडावं म्हणून या विधी केल्या जातात. लग्नातील प्रत्याक विधीला खुप महत्वं आहे. सगळ्या विधी निट पार पडल्यानंतर घरच्यांना समाधान मिळतं. लग्नात अडथळा येऊ नये म्हणून घरची मंडळी लग्नातील प्रत्याक विधीची सामग्री फार आधीपासून जुळवाजुळव करत अस्तात.  

2/7

लग्नात विविद्ध प्रकारचे विधी पार पडतातमग त्यामध्ये मंगळसुत्र उलटं घालणं, वरमाला घालणं आणि आक्षता टाकणं या सगळ्या विधींचा समावेश अस्तो. पण नेमकं लग्नात डोक्यावर अक्षता का टाकतात? हा प्रश्न बऱ्याचं लोकांना पडतो. 

3/7

अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्याला तेल, कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या म्हणजे अक्षता. लग्नकार्यात मंत्र उच्चारूण झाल्यानंतर वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या की त्यांचं लग्न लागलं किंवा संपन्न झालं असं म्हणतात.

4/7

तांदुळ हे एक असे धान्य आहे की जे आतून कधीच किडत नाही, म्हणजेच ते आतून शुद्ध आहे. म्हणून तर शुद्ध चारित्र्याला धुतलेल्या तांदळाची उपमा दिली जाते. तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही. आयुष्याचा संसार सुद्धा दुभंगू नये ही त्यामागे भावना असते. 

 

5/7

तांदूळ पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावावे लागते, तेव्हा ते खरे बहरते. त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे, आणि नंतर ती दुसऱ्याच्या घरी जाते आणि तेथे बहरते. म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी मानली जाते. असेच मुलीने बहरावे म्हणून अक्षता वापरल्या जातात.

 

6/7

तसचं तांदळाला सुखाचं आणि सौभाग्य प्रतिक मानलं जातं आणि त्यामुळे नवरा-बायकोवर अक्षता म्हणून तांदूळ टाकले जातात. प्राचीन काळात ग्रीसमध्येही वधू-वरांवर याच कारणासाठी पीठ आणि मिठाई उधळण्याची रीत होती.

 

7/7

खरंच आपल्या पुरवजांनी आपल्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत, ज्यामुळे आपण या प्रथा जपल्या पाहिजेल.

 





Read More