PHOTOS

Christopher Nolan... एक असा दिग्दर्शक, ज्याच्या नावावरच 'ओपेनहायमर' हाऊसफुल्ल, पाहा त्याच्याविषयीची A to Z माहिती

er Nolan : कला क्षेत्रात असंच समर्पण दाखवणाऱ्या Christopher Nolan य़ा दिग्दर्शकाचा याची चांगलीच प्रचिती असावी. कारण, चित्रपटांप्रती असणा...

Advertisement
1/7
Oppenheimer
Oppenheimer

सध्या नोलान चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या Oppenheimer या चित्रपटामुळं. तब्बल 2000 हून अधिक किंमतीचं तिकीट खरेदी करून सिनेरसिक त्याच्या दिग्दर्शनात साकारलेला हा चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत. चित्रपटाची पटकथा हे त्यामागचं कारण आहेच. पण, नोलानच्या नावावरही हा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. 

 

2/7
ख्रिस्तोफर एडवर्ड नोलान
ख्रिस्तोफर एडवर्ड नोलान

ख्रिस्तोफर एडवर्ड नोलान हे या दिग्दर्शकाचं पूर्ण नाव. 30 जुलै 1970 ला जन्मलेला नोलान हा एक ब्रिटीश अमेरिकन दिग्दर्शक आहे. अतिशय आव्हानात्मक कथानकांची मांडणी करण्यासाठी तो ओळखला जातो. 21 व्या शतकातील उत्तमोत्तम दिग्दर्शक म्हणून त्याच्या नावाचा उल्लेख होतो. 

 

3/7
'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर'
 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर'

गोल्डन ग्लोब, ऑस्कर , बाफ्टा अशा मानाच्या पुरस्कारांची नामांकनं नोलानच्या चित्रपटांना मिळाली आहेत. जगातील 100 प्रभावी व्यक्तीमत्त्वांच्या यादीतही त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. चित्रपटांच्या जगतात दिलेल्या योगदानासाठी त्याला 2019 मध्ये 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर'या बहुमानासाठी निवडण्यात आलं होतं. 

 

4/7
कमी वयात चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाची सुरुवात
कमी वयात चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाची सुरुवात

यूनिवर्सिटी कॉलेज लंडन येथून शिक्षण घेतलेल्या नोलाननं फार कमी वयात चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाची सुरुवात केली. 1998 णध्ये 'फॉलोइंग' नावाच्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यानं रुपेरी पडद्यावर दिग्दर्शनात पदार्पण केलं. 

 

5/7
ऑस्करचं नामांकन
ऑस्करचं नामांकन

2000 मध्ये आपेल्या 'मेमेंटो' चित्रपटानं तो प्रकाशझोतात आला. या चित्रपटासाठी त्याला बेस्‍ट ऑरिजनल स्‍क्रीनप्‍ले या विभागात अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्करचं नामांकन मिळालं. 

 

6/7
ख्रिस्तोफर नोलानचा 12 वा चित्रपट
 ख्रिस्तोफर नोलानचा 12 वा चित्रपट

oppenheimer हा ख्रिस्तोफर नोलानचा 12 वा चित्रपट आहे. याआधी त्यानं 'बॅटमॅन बिगिन्स',  'द डार्क नाइट' आणि 'द डार्क नाइट राइजेज' हे चित्रपट साकारले ज्यामुळं तो बॉक्स ऑफिसचा राजाच ठरला. 

7/7
चाहतावर्ग प्रचंड मोठा
चाहतावर्ग प्रचंड मोठा

'इंसेप्‍शन', 'इंटरस्‍टेलर', 'डंकर्क' आणि 'टेनेट' हे त्याचे आणखी काही दर्जेदार चित्रपट. नोलानचा चित्रपट म्हटलं की, तो तुम्हाला विचार करायला भाग पाडणार हे नक्की. त्यामुळं जगाच्या पाठीवर त्याच्या दिग्दर्शनाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असून, दिवसागणिक वाढतच चालला आहे. 

 





Read More