PHOTOS

'IDIOT सिंड्रोम'ची जगभर चर्चा! जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; तुम्हालाही झालायं का हा विकार?

ing About IDIOT Syndrome: जगभरातील जवळपास सर्वच देश सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने यासंदर्भातील एक इशाराच जारी केला...

Advertisement
1/17

एखादा प्रश्न पडला की आपल्यापैकी अनेकजण मोबाईलवर लगेच सर्च इंजिनच्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात इंटरनेटने क्रांती घडवली असून आपल्या जीवनावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

 

2/17

अगदी कोणत्याही विषयावरील माहिती आज आपल्या तळहातावर असलेल्या पाच इंचाच्या स्क्रीनवर काही सेकंदात उपलब्ध होते. इंटरनेटचा वापर एवढा वाढला आहे की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जवळपास सर्वच उद्योग व्यवसाय आणि व्यक्ती इंटरनेटवरच अलंबून आहेत.

 

3/17

इंटरनेटने आरोग्यविषयक क्षेत्रावरही मोठा परिणाम केला आहे. अर्थात हा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही आहे. त्यापैकी एका नकारात्मक परिणामसंदर्भात आता थेट जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिला आहे.

 

4/17

इंटरनेटवर हल्ली अनेकजण त्यांना दिसणाऱ्या वेगवेगळ्या लक्षणांसंदर्भात सर्च करुन स्वत: आपल्याला काय झालं असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. अनेकजण स्वत:ला होत असणारा त्रास हा कोणत्या प्रकारचा आजार आहे हे शोधण्यासाठी गुगलची मदत घेतात. तुम्ही सुद्धा असं करत असाल तर तुम्हालाही इडियट संड्रोमचा त्रास आहे असं समजावं.

 

5/17

इडियट सिंड्रोममधील IDIOT चा फुलफॉर्म इंटरनेट डिराइव्हड इन्फॉर्मेशन ऑबस्ट्रॅक्शन ट्रीटमेंट (Internet Derived Information Obstruction Treatment) असा आहे. याला सायबरकॉन्ड्रीया (Cyberchondria) असंही म्हणतात.

 

6/17

इडियट सिंड्रोममध्ये इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अफाट माहितीच्या स्तोतांपर्यंत रुग्णांना सहज पोहोचता येत असल्याने खरे म्हणजेच विश्वासार्ह उपचार करताना अडथळा निर्माण होतो. 

 

7/17

इंटरनेटवरील सर्चच्या आधारे इडियट सिंड्रोमचा त्रास असलेला रुग्ण स्वत:च स्वत:ला काय झालं असेल याबद्दल वाचतो आणि डॉक्टरांनी किंवा तज्ज्ञांनी सांगितले उपचार नाकारतो. अथवा इडियट सिंड्रोमचा त्रास असणारे रुग्ण स्वत: स्वत:ची औषधं घेतात ज्याचा परिणाम अधिक घातक असू शकतो.

 

8/17

'नॅशनल इंस्टीट्यूट्स ऑफ हेल्थ'च्या 'क्युरिअर' नावाच्या जर्नलमध्ये छापून असलेल्या एका अभ्यासामध्ये इडियट सिंड्रोमबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

 

9/17

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच 'डब्यूएचओ'ने याला इन्फोडेमिक असं म्हटलं आहे. म्हणजेच माहितीची साथ असा या अति माहितीचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे.

 

10/17

आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य रुग्णांना अती जास्त माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्याने ज्या समस्या निर्माण होतात त्याला 'इन्फोडेमिक' म्हटलं जातं. 

 

11/17

डिजीटल जगामध्ये उपलब्ध असलेली भरपूर सारी माहिती आणि एखाद्या आजाराबद्दलची प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत निर्माण होऊन जो गोंधळ उडतो तोच या इडियट सिंड्रोम असणाऱ्या रुग्णांमध्ये दिसून येतो. इडियट सिंड्रोमचा त्रास असलेल्यांना डॉक्टरांच्या तसेच संबंधि क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उपचारांवर विश्वास नसतो.

 

12/17

इंटरनेट हा सध्या माहितीचा सर्वात मोठा स्रोत आहे यात कोणतीही शंका नाही. मात्र एखादी व्यक्ती पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून राहिली तर निर्माण होणारा तणाव आणि त्रास त्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तींवरही परिणाम करतो.

 

13/17

इडियट सिंड्रोममध्ये एखादी व्यक्ती तिला होत असलेल्या त्रासाबद्दल चुकीचे समज करुन घेण्याची शक्यात अधिक असते. कोणाताही गंभीर आजार नसताना आपण आजारी असल्यासारखं अशा व्यक्तींना वाटतं.

 

14/17

आपण आजारी असल्याचा समज झाल्याने इडियट सिंड्रोमचा त्रास असणार लोक इतके घाबरतात की ते शिकलेल्या डॉक्टरांवर आणि त्यांच्या इलाजावरही विश्वास ठेवत नाहीत.

 

15/17

इडियट सिंड्रोमवर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. एखाद्या आजारासंदर्भा किंवा व्याधीसंदर्भात माहिती वाचताना ती आपण कोणत्या वेबसाईटवरुन वाचतोय याकडे लक्ष दिलं पाहिजे. मेडिकल क्षेत्राशीसंबंधित नामवंत वेबसाईट्स, जर्नल्सवरील माहितीवर अधिक अवलंबून राहणं फायद्याचं ठरतं.

 

16/17

इंटरनेटवर माहिती शोधण्याऐवजी आपल्या फॅमेली डॉक्टरांचा किंवा संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरतं. डॉक्टर होणाऱ्या त्रासाचं योग्य निदान करुन परिणामकारक उपचार करण्यास अधिक समर्थ असतात हे रुग्णांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

 

17/17

इंटरनेटचा वापर शिकण्यासाठी करावा. काही गोष्टींची प्राथमिक उत्तर किंवा माहिती शोधण्यासाठी इंटरनेट उत्तम आहे. मात्र आजारासंदर्भात कोणतीही माहिती केवळ वाचून उपचार करण्याऐवजी प्रत्यक्षात डॉक्टर अथवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही फायद्याचं आणि अधिक परिणामकारक ठरतं.

 





Read More