PHOTOS

सरकारच्या नव्या गाईडलाईन्समुळे भारतात What's App वर बंदी येणार?

Advertisement
1/7

दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सोशल मीडिया कंपन्यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.  ज्यामुळे सोशल मीडियावर वचक बसणार आहे. रविशंकर प्रसाद यांनी वेगवेगळ्या मुद्दे मांडले. त्यापैकीच एक महत्त्वाचा म्हणजे कोणी सोशल मीडियावर फसवणूक करीत असेल तर कंपनीने त्यांचे मूळ शोधले पाहिजे. पण व्हॉट्सअ‍ॅप म्हणतो की हे असे करता येत नाही.

2/7

व्हॉट्सअॅपने बर्‍याच वर्षांपूर्वी असेही म्हटले होते की एंड टू एंड एन्क्रिप्शनमुळे कोणाकडून आणि कोणाला संदेश पाठविला गेला हे आम्हाला कळू शकत नाही. यापूर्वीही अशी मागणी सरकारने केली होती. परंतु यावेळी ही मागणी नाही तर सरकारने थेट नियमच बनवले आहेत. व्हॉट्सअॅपने या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्यास नकार दिल्यास काय होईल? व्हॉट्सअॅपवर बंदी घालणार?

3/7

व्हॉट्सअॅपने आधीपासूनच हे स्पष्ट केले आहे की, मॅसेजचे मूळ काय आहे ते व्हॉट्सअॅपवर मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत आता व्हॉट्सअॅपने मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारली नाही तर काय होणार? यावर बंदी घालण्यात येईल का?

4/7

सोशल मीडिया कंपनी फेसबुकचे म्हणणे आहे की, त्यांचे व्यासपीठ असे आहे की एन्क्रिप्शनची समाप्ती झाल्यामुळे लोकांचे मूळ शोधणे कठीण आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले की, जर सोशल मीडिया कंपन्यांना कोणत्याही परिस्थितीत सरकारकडून विचारले गेले तर त्यांना कंटेंटचे मूळ कोण आहे हे सांगावे लागेल. म्हणजेच, कोणी  कंटेंट पोस्ट केली ते सांगावे लागेल.

5/7

सहसा व्हॉट्सअ‍ॅपवर काही मेसेज व्हायरल होतात. ज्यामुळे दंगल किंवा हिंसा निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत एंड टू एंड एन्क्रिप्शन वापरणार्‍या कंपन्यांना संदेश कोठून आला हे शोधणे कठीण आहे.

6/7

व्हॉट्सअ‍ॅपने असा युक्तिवाद केला आहे की, व्हॉट्सअ‍ॅपवर एंड टू एंड एन्क्रिप्शन चॅटमुळे मेसेजचा प्रारंभकर्ता कोण हे शोधणे शक्य नाही. व्हॉट्सअॅपने असे उत्तर दिले होते की असे करणे शक्य नाही. व्हॉट्सअॅपने म्हटले होते की यामुळे गोपनियता राखता येणार नाही.

7/7

एंड टू एंड एन्क्रिप्शन मध्ये एजन्सीला किंवा तिसऱ्या व्यक्तीला कोणताही मॅसेज मिळवता येत नाही. चॅट हे फक्त २ युजर्समध्येच राहतं.





Read More