PHOTOS

सुटलेल्या पोटामुळं Uncomfertable आहात? 'हे' 5 पदार्थ वेगानं कमी करतील वजन

्या माध्यमातून कोणतातरी डाएट प्लान शोधून काढायचा आणि तो अवलंबात आणायचा असंच काहीतरी तुमच्याआमच्यापैकी कितीतरीजण करत असतील. पण, याचा फ...

Advertisement
1/7
डाएट प्लान
डाएट प्लान

Weight Loss Diet: मुळात चुकीच्या पद्धतीनं Follow केला जाणारा डाएट प्लान सहसा फार फायद्याचा ठरतच नाही. कारण, तिथं शरीराराल गरजेच्या असणाऱ्या पोषक तत्वांचा पुरवठा सहसा केलाच जात नाही. 

2/7
चवीचे पदार्थ खाण्याची हौस
 चवीचे पदार्थ खाण्याची हौस

Weight Loss Diet: अशा वेळी नेमकं काय करावं? पूर्णपणे डाएटच्या आहारी जायचं म्हटलं तर चवीचे पदार्थ खाण्याची हौस मागेच सोडावी लागेल याची चिंताही अनेकांनाच असते. पण, तुम्हाला माहितीये का काही चवीचे पदार्थ खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता. यातलाच एक प्रकार म्हणजे नट बटर. 

 

3/7
पीनट बटर (Peenut Butter For Weight Loss)
पीनट बटर (Peenut Butter For Weight Loss)

आरोग्यदायी स्निग्ध घटक असणारं पीनट बटर हा प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. यामुळं भूकही भागते. 

 

4/7
काजू बटर (Cashew Butter For Weight Loss)
काजू बटर (Cashew Butter For Weight Loss)

वजन कमी करण्याच्या Mission मध्ये तुम्हाला काजू बटरही फार मदत करतं. तंतूमय घटकांपासून प्रथिनांपर्यंत अनेक पोषक तत्वं यामध्ये असतात. त्याशिवाय झिंक, मॅग्नेशियम आणि अधिक प्रमाणांत विटामिन्सही यामध्ये असतात. 

 

5/7
वॉलनट बटर (Walnut Butter For Weight Loss)
वॉलनट बटर (Walnut Butter For Weight Loss)

मेंदू आणि हृदयासाठी अकरोडचं बटर कायम फायद्याचं ठरतं. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात. यामध्ये असणारी पोषक तत्वं आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. 

 

6/7
तिळाचं बटर (Sesame Seed Butter For Weight Loss)
तिळाचं बटर (Sesame Seed Butter For Weight Loss)

तिळापासून तयार करण्यात आलेल्या बटरच्या सेवनामुळं पोट रिकामं भासत नाही, ज्यामुळं नको त्या वेळी नको ते पदार्थ खाणं टाळलं जातं. शिवाय शरीराला प्रचंड उर्जाही मिळते. 

 

7/7
आलमंड बटर (Almond Butter For Weight Loss)
आलमंड बटर (Almond Butter For Weight Loss)

कमीत कमी प्रमाणात आलमंड बटर खाल्यास त्याचे वजन कमी करण्यास बरेच फायदे होतात. यामुळं रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यातही मदत होते. 

 





Read More