PHOTOS

Weekly Money Horoscope : आठवड्याभरात पैशांनी भरेल तिजोरी! कोणत्या राशींचं नशीब पालटणार?

to 02 July 2023 : जून शेवटचा आठवडा काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. जाणून घ्या कोणत्या...

Advertisement
1/13
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

या आठवड्यात बुध मिथुन राशीत असणार आहे, त्यामुळे हा आठवडा पैसा आणि करिअरच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे. 

2/13
मेष (Aries)
मेष (Aries)

आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीकोनातून हा आठवडा या राशींसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. प्रगतीचे नवीन आलेख तयार कराल. घरात आनंदाचे वातावरण असून उत्सवासाठी शुभ योग जुळून आला आहे. प्रवासातून अनेक संधी मिळणार आहेत. 

3/13
वृषभ (Taurus)
वृषभ (Taurus)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी प्रगतीची दृष्टिकोनातून स्लो असणार आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला असेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासातून यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आठवड्याचा शेवट नवीन यश घेऊन येणार आहे. 

4/13
मिथुन (Gemini)
मिथुन (Gemini)

आर्थिकदृष्ट्या या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी सतर्क राहा. आर्थिक घडी योगरित्या बनणार आहे. आठवड्याच्या शेवटी कामात अडचणी येऊ शकतात. 

5/13
कर्क (Cancer)
कर्क (Cancer)

या लोकांना कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी मिळणार आहे. धनलाभाचे योग असल्याने आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. या आठवड्यात कामानिमित्त प्रवास टाळणे योग्य ठरणार आहे. अहंकारावर नियंत्रण ठेवा अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. 

 

6/13
सिंह (Leo)
सिंह (Leo)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी प्रगती घेऊन येणार आहे. नवीन गुंतवणुकीतून धनलाभाचे योग आहेत. हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय शुभ असून प्रवासातूनही फायदा होणार आहे. 

7/13
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

या राशींच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. बँक बॅलेन्स वाढणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. कुटुंबातही चांगल वातावरण असेल. एखाद्या महिलेच्या मदतीने यश संपादन कराल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. 

8/13
तूळ (Libra)
तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा कठीण असणार आहे. आर्थिक घडी ठिक ठाक असेल. आरोग्याची समस्या उद्भवणार आहे. कामाच्या ठिकाणीही तणाव असणार आहे. 

9/13
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक (Scorpio)

आर्थिकदृष्ट्या हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. रखडलेली कामं सहज मार्गी लागतील. तिजोरी छोटी पडेल एवढा धनलाभ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी मनं जरा उदास राहिल. 

10/13
धनु (Sagittarius)
धनु (Sagittarius)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण राहिल. कुटुंबात मात्र आनंद असेल. आर्थिक गणित बसवताना नाकी नऊ येईल. 

11/13
मकर (Capricorn)
मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदादायी असणार आहे. आर्थिक गणित योग्यरित्या बसणार आहे. कामाच्या ठिकाणी जरा अडचणी येतील नंतर सगळं काम मार्गी लागेल. प्रवासातून नवीन ओळख होईल. जी भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. 

12/13
कुंभ (Aquarius)
कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा समृद्धी आणि सुख घेऊन आला आहे. धनलाभाचे योग आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होईल. बँक बॅलेन्स वाढणारा हा आठवडा ठरणार आहे. 

13/13
मीन (Pisces)
मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. नवीन प्रकल्पात तुम्ही व्यस्त असणार आहात. आर्थिक व्यवहारात लक्ष द्या. कुटुंबातील मालमत्तेतून वाद होण्याची शक्यता आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )





Read More