PHOTOS

Vidhan Parishad Election: काँग्रेसचे 'हे' तीन आमदार फुटू शकतात? आमदार कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

on : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी म्हणजे 12 जुलैला होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणाराय... या निवडणुकीत मोठ्या प्रम...

Advertisement
1/7

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला म्हणजे शुक्रवारी होणारी निवडणूक चुरशीची ठरणाराय. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसलीय... भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर असे 5 उमेदवार आहेत.

2/7

शिवसेना शिंदे गटाकडून कृपात तुमाने आणि भावना गवळी असे 2 उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे  2 उमेदवार आहेत. काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सावत, शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील निवडणूक लढवतायत. 

3/7

काँग्रेसचे 3-4 आमदार फुटू शकतात अशी शक्यता काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केलीये.  तर जे डाऊटफूल आहेत त्यांचा बंदोबस्त केला जाईल असंही ते म्हणालेत. आंध्र आणि नांदेड बॉर्डरसह टोपीवाला आमदार फुटण्याची शक्यता गोरंट्याल यांनी व्यक्त केलीये. हॉटेल पॉलिटिक्समध्ये आमच्या काँग्रेसच्या आमदारांचे फक्त जेवण आहे. आमचे चेन्नीथला येणार आहेत. ते मार्गदर्शन करणार आहेत. जे 3-4 डाऊटफूल आहेत त्यांची व्यवस्था केली जाईल असंही ते म्हणाले.

4/7

सुरुवातीला गोरंट्याल यांनी 'टोपीवाला' आमदार असा उल्लेख केला. सध्या विधानसभेत असलेले टोपीवाले आमदार म्हणजे राष्ट्रवादीचे झिरवळ, तसंच काँग्रेसचे शिरीष चौधरी आणि हिरामन खोसकर आहेत... या नावांचा विचार केल्यास हिरामन खोसकर यांचं नाव लगेच येतं. कारण त्यांनी अलिकडेच भुजबळांची भेट घेतली होती आणि ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

5/7

गोरंट्याल यांनी दुसरा उल्लेख केला तो 'आंध्र आणि नांदेड बॉर्डरवरचे आमदार'. आंध्र आणि नांदेडच्या बॉर्डरवर काँग्रेस आमदाराचा मतदारसंघ येतो तो म्हणजे देगलूर. या मतदारसंघात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आमदार आहेत. जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे गोरंट्याल यांचा रोख अंतापूरकरांवरच असण्याची जास्त शक्यता आहे.

6/7

गोरंट्याल यांच्या म्हणण्याप्रमाणे तिसरा आमदार म्हणजे 'ज्यांचे वडील राष्ट्रवादीत आहेत'. लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्याकडे गोरंट्याल यांचा रोख दिसतोय. झिशान राष्ट्रवादीत जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय. केवळ आमदारकी रद्द होऊ नये म्हणून ते काँग्रेसमध्ये असल्याचं बोललं जातंय.

7/7

विधानपरिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेत... आपापल्या पक्षाच्या आमदारांची खास बडदास्त ठेवण्यात आलीय. त्यासाठी आमदारांचा मुक्काम मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये हलवण्यात आलाय. राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपल्या आमदारांना कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलात ठेवलेलं नाही. आमदारांना हॉटेलात ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य नाही, असं जयंत पाटील म्हणाले..





Read More