PHOTOS

Vastu Tips : वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व काय? त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या

योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्रदेखील आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करते. तुमच्या वास्तूमधील दोष हे लक्ष्मी आगमनासह अडथळा बनतो. त्या...

Advertisement
1/12

वास्तूशास्त्र नियमानुसार घराची रचना केली तर त्या घरातील व्यक्तीच्या आयुष्यात धनसंपदेपासून करिअरपर्यंत फायदे होतात. त्यामुळे आज आमच्या ज्योतिष तज्ज्ञ यांनी आपल्याला 10 दिशांचं महत्त्व, त्यांची नावं आणि देवता याबद्दल माहिती सांगितली आहे. 

2/12
10 दिशांची नावं
10 दिशांची नावं

त्या म्हणतात की, मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण याशिवाय अजून 6 दिशा असतात. त्या म्हणजे उत्तर-पश्चिम, उत्तर-पूर्व, दक्षिण-पूर्व, दक्षिण-पश्चिम, दक्षिण-पूर्व, उत्तर - दक्षिण.

3/12
ईशान्य दिशा
ईशान्य दिशा

वास्तूमधील उत्तर आणि पूर्व दिशेच्या दरम्यानच्या स्थानाला ईशान्य दिशा म्हटलं जातं. या दिशेत भगवान विष्णूचा वास असतो तर या दिशेचा अधिपती गुरु ग्रह असतो. या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे असं शुभ मानले जाते. तर ही दिशा ज्ञान, विवेक आणि बुद्धीची असल्याने ही पूजेसाठी उत्तम जागा असते. ही दिशा दोषमुक्त असेल तर घरात सुखसमृद्धी नांदते. 

4/12
पूर्व दिशा
पूर्व दिशा

पूर्व दिशेचा देवता हा इंद्रदेव आहे. तर अधिपती सूर्यदेव आहे. असं म्हणतात या दिशेमध्ये पूर्वजांचा वास असतो. ही दिशा म्हणजे आरोग्य, बुद्धिमत्ता आणि संपत्तीची कारक मानली जाते. या दिशेला कामय मोकळं ठेवावं इथे पायऱ्या बांधणे अशुभ मानलं जातं. या दिशेमध्ये दोष असल्यास घरातील व्यक्ती सतत आजारी पडतो. 

 

5/12
उत्तर-पश्चिम दिशा
उत्तर-पश्चिम दिशा

उत्तर-पश्चिम मध्यभागी असलेल्या स्थानाला उत्तर-पश्चिम दिशा असं म्हणतात. या दिशेची देवता वायु तर अधिपती ग्रह चंद्र असतो. ही दिशा स्वच्छ ठेवावी आणि इथे हलक्या-फुलक्या गोष्टी ठेवल्याने नात्यात गोडवा राहतो. 

6/12
पश्चिम दिशा
पश्चिम दिशा

ही दिशा शनिदेवाची असते तर इथे वरुण देवाचा वास असतो. त्यामुळे या दिशेत जड वस्तू ठेवणे शुभ मानले जाते. ही दिशा कधीही रिकामी ठेवू नये अन्यथा आर्थिक गणीत बिघडतं. ही दिशा यश आणि कीर्तीचं कारक आहे. 

7/12
उत्तर दिशा
उत्तर दिशा

उत्तर दिशेचे देवता कुबेर देवा असून अधिपती ग्रह बुध आहे. ही दिशा संपत्तीची मानली जाते. त्यामुळे या दिशेला माता लक्ष्मीचा फोटो लावणे शुभ मानले जाते. असं केल्यास घरावर आर्थिक संकट दूर राहतं. ही दिशा बुद्धी, ज्ञान आणि ध्यान्याची असते. 

8/12
आग्नेय दिशा
आग्नेय दिशा

या दिशेची देवता अग्निदेव असून या दिशेचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या दिशेला किचन असणं अतिशय शुभ मानले जाते. ही दिशा म्हणजे प्रजनन आणि संतती वाढची असते. त्याशिवाय या दिशेत दोष असेल तर लोक आळशी असतात. 

 

9/12
दक्षिण दिशा
दक्षिण दिशा

या दिशेची देवता यमराज असून स्वामी मंगळ असतो. या दिशेमध्ये जड वस्तू ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. या दिशेला घराचा दरवाजा कधीही नसावा. त्याशिवाय या दिशेला आरसा, पाणी नसावं.

10/12
नैऋत्य कोन
नैऋत्य कोन

या दिशेची देवता नैरीत देव असून या दिशेचे अधिपती ग्रह राहू आणि केतू असतात. या ठिकाणी कधीही पाणी नसावं. 

 

11/12
उभ्या दिशा
उभ्या दिशा

आकाशाच्या दिशेला उभ्या दिशा असं संबोधलं जातं. तर या दिशेचा स्वामी ब्रह्मदेव असतो. पण या दिशेला कोणतेही शासक ग्रह नसतो. असं म्हणतात या दिशेकडे तोंड करुन प्रार्थना केली तर ती पूर्ण होते. 

12/12
पाताल किंवा अधो दिशा
पाताल किंवा अधो दिशा

 पृथ्वी किंवा पाताल यांच्या दिशेने जी दिशा असते तिला पाताल किंवा अधो दिशा असं संबोधलं जातं. या दिशाचा देवता नाग असतो. त्यामुळे नवीन बांधकाम करताना भूमिपूजन आणि गृहप्रवेश विधी करायचा असतो.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 





Read More