PHOTOS

कामाची माहिती! तिशीच्या आत 'या' 5 मार्गांनी पैसा गुंतवला नाही, तर पश्चातापाची वेळ अटळ

cklist : गुंतवणुकीचाच विचार करायचा झाला, तर प्रत्येकत व्यक्ती कमीजास्त प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत त्यानुसार पैसे गुंतवत असता...

Advertisement
1/7
वयाचा महत्त्वाचा टप्पा
वयाचा महत्त्वाचा टप्पा

Investment Plans financial checklist : कोणत्याही व्यक्तीसाठी वयाची 20 ते 30 यादरम्यानची वर्षे अतिशय महतत्वाची असतात. कारण, याच वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं जीवनाचा कलाटणी मिळत असते. साधारण निवृत्तीचं वय 60 वर्षे गृहित धरलं तरीही तिशीच्या टप्प्यावर गुंतवणूकीची आखणी केल्यास उतारवयाच या निर्णयांचा फायदा होतो. 

2/7
आर्थिक नियोजन
आर्थिक नियोजन

वयाच्या या टप्प्यावर तीस वर्षांच्या आधीच काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवल्यास निवृत्तीपर्यंतच्या, दरम्यानच्या तीस वर्षांमध्ये बऱ्याचजणांना या आखणीमुळं आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन त्यांचं निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखद व्यतीत होण्यास मदत होते. 

3/7
हेल्थ इन्शोरन्स
हेल्थ इन्शोरन्स

आजारपणाच्या वेळी रुग्णालयातील खर्चासाठी लागणाऱ्या पैशांसाठी हेल्थ इन्शोरन्स फायदाचा ठरतो. त्यामुळं तिशीपर्यंत पोहोचता पोहोचता हा पर्याय निवडणं फायद्याचं. 

 

4/7
घर- वाहनासाठीचं प्लॅनिंग
घर- वाहनासाठीचं प्लॅनिंग

नोकरीच्या ठिकाणी स्थैर्य मिळाल्यानंतर स्वत:चं घर आणि त्यामागोमाग वाहन खरेदीचा विचार करणं आणि त्या दृष्टीनं Saving करणं यात काहीच गैर नाही. या पर्यायामुळं पैशांचा अवाजवी खर्च टाळण्यास प्रोत्साहन मिळतं आणि जीवनात एक नवा टप्पा गाठण्याची संधीही मिळते. 

 

5/7
लहान काळासाठीची गुंतवणूक
लहान काळासाठीची गुंतवणूक

अनेकदा आर्थिक सल्लागारांकडून Long term investment साठी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित केलं जातं. पण, Short term पद्धतीमध्ये पैसे गुंतवणंही इथं फायद्याचं ठरतं. यामुळं तुमच्या लहानसहान गरजा आणि आर्थिक निकड पूर्ण होण्यास मदत होते. 

 

6/7
निवृत्तीसाठीचं नियोजन
निवृत्तीसाठीचं नियोजन

वयाची तिशी ओलांडल्यानंतर निवृत्तीच्या वयापर्यंत चांगली रक्कम जमा करून उतारवयात त्या रकमेच्या आधारावर इतर गोष्टींची आखणी करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण, तिशीच्या आधीच निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीच्या आर्थिक तरतुदी करण्याचा सल्ला कायम उपयुक्त ठरतो. 

 

7/7
आपत्कालीन आर्थिक व्यवस्था
आपत्कालीन आर्थिक व्यवस्था

अडीनडीच्या काळासाठी काही मंडळी कोणतीही आर्थिक तरतूद करत नाहीत. अशा मंडळींनी तिशीच्या आधीच Emergancy Funds साठी पैशांची जमवाजमव करत Saving ची सवय लावावी. तुमच्याकडे इतके पैसे जमा ठेवावेत ज्यांच्या आधारे तुम्ही किमान 6 महिने सुखात जगू शकता. 

(वरील सल्ले सर्वसामान्य संदर्भांआधारे असून, आर्थिक मदतीसाठी तज्ज्ञ सल्लागारांची मद अवश्य घ्या.)

 

 





Read More